नवी दिल्ली : रुग्णालयात रुग्णाचा जीव वाचतो असं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल पण बिहारच्या दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी आलेल्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील असुविधा आणि बेजबाबदारपणा यामुळे चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे.
रुग्णालयात चिमुकल्य़ाला उंदीर चावल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. कुटुंबियांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. उंदीर मुलांच्या जवळ जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली होती पण त्यावर काहीच पाऊलं उचलण्यात नाही आली. उंदीर चिमुकल्याच्या पायाच्या बोटांना चावला. यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
Darbhanga: 9-day-old infant died allegedly after being bitten by rats in NICU of Darbhanga Medical College & Hospital on October 29. Dr. Om Prakash says "I've no such information. Family is claiming so. But we can investigate it since we know there is menace of rats here". #Bihar pic.twitter.com/lLzx7TBr7q
— ANI (@ANI) October 31, 2018
पण चिमुकल्याचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल्याचं रुग्णालयाने म्हटलं आहे. रुग्णालयांची अवस्था बिकट होत असल्य़ाची स्थिती आहे. रुग्णालयातील अनेक घटना समोर येत असतात.