बाबा रामदेवांच्या 'पतंजली'ची ई-कॉमर्समध्ये एन्ट्री

बाबा रामदेवांची कंपनी 'पतंजलि'ची उत्पादनं आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. 

Updated: Jan 16, 2018, 06:46 PM IST
बाबा रामदेवांच्या 'पतंजली'ची ई-कॉमर्समध्ये एन्ट्री  title=

नवी दिल्ली : बाबा रामदेवांची कंपनी 'पतंजलि'ची उत्पादनं आता ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. 

यासाठी पतंजलिनं अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांशी करार केलाय. मंगळवारी यासंबंधी घोषणा करताना योगगुरू रामदेव यांनी आता पतंजलि हरिद्वारपासून प्रत्येक द्वारात दाखल होणार असल्याचं म्हटलंय. 

यासोबतच त्यांनी केंद्र सरकारच्या रिटेल क्षेत्रातील १०० टक्के एफडीआयचा विरोध केला. रिटेल क्षेत्रात परदेशी गुंतवणूक येऊ नये, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

पतंजलि येत्या काळात 'नॉट फॉर प्रॉफिट'कडे वाटचाल करणार असल्याचं तसंच १ लाख करोड दान करणार असल्याची घोषणा केलीय. 

सध्या पतंजलिची क्षमता दररोज १० लोकांनी ऑर्डर पोहचवण्याची आहे. ऑनलाईनच्या मदतीनं ही क्षमता वाढवण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या दरम्यान बाबा रामदेव यांनी पतंजलिचं ऑनलाईन पोर्टलही लॉन्च केलं.