Ayodhya Ram Mandir Inauguration : ...म्हणून लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत, मोठं कारण समोर

Ayodhya Ram Mandir Inauguration : कैक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलेली असतानाच या महत्त्वाच्या क्षणासाठी लालकृष्ण अडवाणी गैरहजर का राहणार?   

सायली पाटील | Updated: Jan 22, 2024, 09:52 AM IST
Ayodhya Ram Mandir Inauguration : ...म्हणून लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत, मोठं कारण समोर  title=
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha why lal krishna advani is not attending the ceremony

Ayodhya Ram Mandir Inauguration : तब्बल 500 वर्षांची अखेर अखेरच्या टप्प्यात आली असून, भारतामध्ये राम जन्मभूमीत राम मंदिर आकारास आलं असून, या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. सोमवारी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सुरूवात होईल. या सोहळ्याच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती असेल. बऱ्याच आमंत्रितांचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे. पण, राम मंदिर निर्माण आंदोलन आणि तत्सम गोष्टींमध्ये मुख्य सहभाग नोंदवणारे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मात्र या सोहळ्यासाठी अनुपस्थित असणार आहेत. 

अडवाणींच्या अनुपस्थितीचं कारण काय? 

लालकृष्ण अडवाणी यांचं वय 96 वर्षे असून, त्यांच्या प्रकृतीला केंद्रस्थानी ठेवत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अयोध्येमध्ये सध्याच्या घडीला कडाक्याची थंडी पडली असून, त्यामुळं अडवाणी यांना उतारवयात कोणताही त्रास होऊ नये यासाठी ते या सोहळ्याला अनुपस्थित असतील असं सांगितलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : Ram Mandir Inauguration LIVE : आरंभी वंदीन अयोध्येचा राजा! रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अवघ्या काही क्षणांत 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार यांनी अडवाणी यांच्या घरी जात त्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी आपल्याला या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळत आहे ही मोठी भाग्याचीच बाब असल्याची प्रतिक्रिया अडवाणी यांनी दिली होती. देशात राम मंदिर साकारण्यात आल्यामुळं एका विश्वासाचाच पाया रचला गेला असून, देशातील वातावरण मंगलमय झालं आहे, हा विचारही त्यांनी मांडला होता.