अरुणाचल प्रदेशाला भूकंपाचा तीव्र धक्का

 यापूर्वी ९ मे रोजी उत्तर भारताच्या अनेक भागांना भूकंपाचे झटके बसले होते.

Updated: Jun 2, 2018, 09:15 PM IST
अरुणाचल प्रदेशाला भूकंपाचा तीव्र धक्का  title=

ईटानगर : अरुणाचल प्रदेशात दुपारी भूकंपाचा तीव्र झटका बसला. दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास अरुणाचलच्या तेजू पासून  ११४ किलोमीटर दूर अंतरावर हा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल मोजण्यात आलीय. भूकंपाच्या धक्क्यानंतर भीतीनं लोक इमारतींबाहेर निघून आले. सध्या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचं वृत्त नाही. 

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी ९ मे रोजी उत्तर भारताच्या अनेक भागांना भूकंपाचे झटके बसले होते. भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तान-तजाकिस्तानच्या सीमेलगत होतं. 

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे मध्यम झटके जाणवले. श्रीनगरच्या हवामान विभाग अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, खोऱ्यात आणि जम्मू क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवले.