अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशचे सीएम पेमा खांडूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द खंडू यांनी स्वत: राज्यातील मियाओ ते विजयनगर या प्रवासाचे फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये ते स्वत: गाडी चालवताना दिसत आहे. पेमा खांडू विजयनगरमध्ये राहणाऱ्या योबिन जमातीच्या लोकांना भेटायला गेले आणि या प्रवासात त्यांनी अनेक कठीण रस्त्यांवरुन स्वत: गाडी चालवली. या व्यतिरिक्त ते त्यांच्या सुरक्षा कर्मचार्यांसह चिखलातून आपली गाडी काढतानाही दिसले आहेत.
पेमा खांडू यांनी या प्रवासाचे फोटो आणि व्हीडिओ ट्विट करुन लिहिले की, 'मियाओ ते विजयनगर हा 157 किलोमिटरचा कार आणि पायी चालत केलेला प्रवास एक अविस्मरणीय प्रवास होता. 26 मार्च रोजी पहाटे 5 वाजता मी डेबॉनहून सुरु केलेला प्रवासामध्ये दुसर्या दिवशी रात्री गांधीग्राम (137 किमी) पर्यंत पोहोचलो आणि तेथे आराम केला. मग दुसर्या दिवशी आम्ही विजयनगरला रवाना झालो.'
अरुणाचल प्रदेशचे सीएम खांडू यांनी विजयनगरसाठी ज्या रस्त्याने प्रवास केला त्या रस्त्याला वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाही. वाहनांच्या वाहतुकीसाठी येथे रस्ता नसल्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी तेथे दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, लवकरच या ठिकाणी चांगला रस्ता तयार करण्यात येईल, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होईल
A story of our journey to reach the unreached...
It took us two days to reach #Vijaynagar from #Miao travelling 157km through mud and jungle.
Vijaynagar is a beautiful valley surrounded on three sides by Myanmar. @PMOIndia @HMOIndia @adgpi @MDoNER_India @MyGovArunachal pic.twitter.com/cqgtI5PK80
— Pema Khandu པདྨ་མཁའ་འགྲོ་། (@PemaKhanduBJP) March 28, 2021
मुख्यमंत्र्यांनी विजयनगरच्या भेटी बद्दल सांगितले की, तेथे पोहोचण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सीएम खंडू स्वत: एका ठिकाणी गाडीचे स्टीयरिंग धरुन गाडी खड्ड्यातून बाहेर काढताना दिसले. या व्यतिरिक्त त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या चिखलात अडकलेल्या गाड्या काढण्यासाठीही मदत केली.