मुंबई : दिवंगत अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कुटुंबियांनी पेन्शन घेण्यास नकार दिला आहे. याकरता त्यांच्या पत्नी संगीता जेटली यांनी राज्यसभेच्या उपसभापती एम वेंकय नायडू यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, भाजप नेत्यांना मिळणारी पेन्शन आम्हाला नको आहे. कुटुंबियांना जवळपास पेन्शनचे तीन लाख रुपये मिळतात.
अरूण जेटली यांच्या पत्नीने पत्रात नमुद केलं आहे की, आम्हाला पेन्शन नको आहे. पण ती पेन्शन ज्या कर्मचाऱ्यांना कमी पगार आहे त्यांच्यात दान करावी असं सांगितलं आहे. त्यापुढे म्हणाल्या की, ज्या महान कार्यावर अरूण जेटली चालत होते तेच कार्य मला पुढे सुरू ठेवायचं आहे.
ज्या संसदेत अरूण जेटली यांनी सेवा केली त्याच संसदेतील गरजू कर्मचाऱ्यांना ही पेन्शन दानच्या स्वरूपात द्यावी. म्हणजे राज्यसभेच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ही देण्यात यावे. मला पूर्ण विश्वास आहे की, अरूण जेटली यांची देखील हीच इच्छा असेल.
पत्राची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील पाठवण्यात आली आहे. 66 वर्षांच्या अरूण जेटली यांनी 24 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. व9 ऑगस्ट रोजी त्यांना श्वासाचा त्रास होत असल्यामुळे रूग्णालयात दाखल केलं होतं.
अरूण जेटली यांना त्यांच्या पगारानुरूप आणि संसदेच्या नियमानुसार महिन्याला 20 हजार पन्शेन देण्यात येते. तसेच दीड हजार पेन्शन ही पाच वर्ष संसदेत कामकाज सांभाळल्यामुळे देण्यात येते. त्याचप्रमाणे अरूण जेटली हे 1999 पाहून राज्यसभेचे सदस्य होते. त्यानुसार त्यांना 22 हजार 500 रुपये महिन्याला पेन्शन येणार. त्यानुसार अरूण जेटली यांच्या कुटुंबियांना महिन्याला एकूण 50 हजार रुपये पेन्शन रूपात मिळणार आहे.