अरूण जेटली डायलिसीसवर, कोणत्याही क्षणी किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना एम्स रूग्णालयात डायलिसिसवर ठेवण्यात आलं आहे.

Jaywant Patil Updated: Apr 9, 2018, 11:58 AM IST
अरूण जेटली डायलिसीसवर, कोणत्याही क्षणी किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया title=

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना एम्स रूग्णालयात डायलिसिसवर ठेवण्यात आलं आहे, इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, एम्समध्ये अरूण जेटली यांच्यावर किडनी टान्सप्लान्टची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने आपल्या सुत्रांच्या माहितीनुसार म्हटलं आहे की, सलग दुसऱ्या दिवशी अरूण जेटली यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्याने संबंधित न्यूज पेपरला दिलेल्या माहिती नुसार, किडनी ट्रान्सप्लान्ट आधी अरूण जेटली यांना काही दिवस डायलिसिसवर ठेवण्यात आलं. ट्रान्सप्लान्टची कोणतीही तारीख ठरलेली नाही आणि पण किडनी ट्रान्सप्लान्ट कोणत्याही दिवशी होवू शकतं.

जेटलींना डायबेटीस असल्याने उशीर

डॉक्टरांनी म्हटलंय की डायलिसिसची गरज यासाठी आहे की, किडनी ट्रान्सप्लान्ट यशस्वी होऊ शकेल. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीत म्हटलंय की, ट्रान्सप्लान्ट सर्जरी रविवारी होणार होती, मात्र जेटलींना डायबेटीस असल्याने उशीर होत आहे.

डोनरच्या सर्व तपासण्या पूर्ण

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीतील महत्वाची बाब म्हणजे, जी व्यक्ती अरूण जेटली यांना किडनी दान करणार आहे, त्या व्यक्तीच्या सर्व तपासण्या झालेल्या आहेत. नियमानुसार डोनरची ओळख गोपनीय ठेवली जाते. जेटली यांच्या किडनी ट्रान्सप्लान्टसाठी एम्समध्ये डॉक्टरांची एक टीम बनवण्यात आली आहे. या टीमचं नेतृत्व डॉ व्ही के बन्सल करीत आहेत.