नवी दिल्ली: भारतीय लष्कराची ताकद आता आणखी वाढणार आहे. डीआरडीओने विकसीत केलेला 118 MK 1 A अर्जुन रणगाडा लष्करात दाखल झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हा रणगाडा लष्कराच्या ताफ्यात दाखल झाला.
अर्जुन रणगाडा हा जगातील सर्वात शक्तीशाली रणगाड्यांपैकी एक आहे. आता या रणगाड्याचं अत्याधुनिक स्वरुप भारतीय सैन्यदलात दाखल झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तमिळनाडूच्या चैन्नईमध्ये 118 MK 1 A अर्जुन रणगाडा सैन्याच्या ताफ्यात दाखल झाला.
या नवीन अर्जुनसमोर पाकिस्तान गुडघे टेकेल. चीनचीही चलाखी या रणगाड्यापुढे चालणार नाही. अर्जुन म्हणजे आधुनिकता, अर्जुन म्हणजे साहस, अर्जुन म्हणजे आत्मनिर्भर असं हे अर्जुनचं सुधारीत स्वरुप आहे. डीआरडीओने त्याची निर्मिती केली आहे.
काय आहेत वैशिष्ट्यं
1. रणगाड्याची मारक क्षमता पहिल्या पेक्षा अधिक आहे
2. रणगाड्यावर हेलिकॉप्टर विरोधी मशीन गन
3. जमिनीवरुन आकाशात अचूक लक्ष्य गाठण्याची क्षमता
4. आधुनिक ट्रान्समिशन सिस्टिममुळे शत्रुचा शोध घेणे शक्य
5. रासायनिक हल्ल्यापासून वाचण्यासाठी विशेष सेन्सर
6. रात्रीच्या वेळी शत्रुला शोधण्यासाठी थर्मल इमेजिंग सिस्टम
7. वजन 68 टन, वेग 58 किमी प्रति तास
हा रणगाडा बनवण्यासाठी आठ हजार चारशे कोटींचा खर्च आला आहे. पंतप्रधानांना संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवायचं आहे. अर्जुनचं अत्याधुनिक स्वरुप त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 14 नोव्हेंबर 2020मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर जैसलमेर इथं गेले असताना अर्जुन रणगाड्यावर स्वार झाले होते. आता हा रणगाडा भारतीय सैन्यदलाच्या ताफ्यात येत आहे.