Make Up Myths : आपण कॉपोरेटसाठी, कुठल्याही ओकेजनसाठी आणि रूटीनलाही मेकअप फेंडे वापरत असतो. परंतु कुठलाही मेक-अप करताना आपण त्यासंबंधी फारशी माहितीही करून घेत नाही. आपल्या मनाला वाटेल तसे आपण मेकअप करण्याचा प्रयत्न करतो. पण मेकअप करण्यापुर्वी त्याबाबतीत योग्य माहिती करून घेणे आवश्यक आहे.
मेकअप करताना आपण योग्य पद्धत वापरली नाही तर आपल्या चेहऱ्यावर पुरळ उठण्याची शक्यता आहे किंवा मेकअप करताना मॉइश्चरायझर लावू नये की लावावे यावर अनेक मतामतांतरे आहेत पण त्यातील खरं कारण जाणून घेणे आवश्यक आहे.
तुम्ही दररोज त्वचा हायड्रेट ठेवली पाहिजे. त्वचेमध्ये तयार होणारे तेल सेबम असते आणि जर ते मॉइश्चरायझ्ड नसेल तर ते कोरडे होऊ लागते. मेकअप करताना मॉइश्चरायझर लावू नये असं लोकांना वाटतं पण मेकअप लावण्यापूर्वी आणि काढल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर वापरा.
मेकअपमुळे मुरुमे होऊ शकतात पण तज्ज्ञांच्या मते जर तुम्ही जास्त काळ चेहऱ्याचा मेकअप काढला नाही तर चेहऱ्यावर मुरुमे होऊ शकतात. पण मेकअपमुळे लागलीच पुरळ येऊ शकते पण काही बाबतीत पुरळ येण्याची शक्यता कमी असते.
असाही एक समज आहे की मेकअप करणाऱ्यांना सनस्क्रीन लावण्याची गरज नसते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही मेक-अप करा किंवा नसो, त्वचेवर गरजेनुसार सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. सनस्क्रीन आपल्या त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्यासोबतच इतर समस्यांपासूनही वाचवते.
मेकअप उत्पादन जितके महाग असेल तितकी त्याची गुणवत्ता चांगली असेल. पण असे नसते काही महागडी उत्पादनेही तुम्हाला फार चांगला रिझल्ट देऊ शकतीलच असं नाही.