दर्शनासाठी पैसे मागितल्याचा Archana Gautam चा धक्कादायक आरोप

अर्चना गौतम हिचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होतो आहे. 

Updated: Sep 8, 2022, 02:20 PM IST
दर्शनासाठी पैसे मागितल्याचा Archana Gautam चा धक्कादायक आरोप    title=
archana gautam alleged on ttd employee for misbehaved with her Video Viral on Social Media

Archana Gautam: बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांमधील अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'ग्रेट ग्रँड मस्ती', 'हसीना पारकर', 'बारात कंपनी' यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. सध्या ती पडद्यापासून दूर आहे. पण हस्तिनापूरमधून काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवल्यामुळे ती चर्चेत आली होती. शिवाय बिकिनी गर्ल म्हणूनही तिची ओळख आहे. 

अर्चना गौतम हिचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होतो आहे.  या व्हिडीओमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल तिने सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, तिला मंदिरातील काही कर्मचारी रेकॉर्डिंग करण्यापासून रोखत आहेत. यात अर्चना गौतम रडताना आणि किंचाळताना दिसत आहे. (rchana gautam alleged on ttd employee for misbehaved with her Video Viral on Social Media)

हा व्हिडीओ शेअर करताना अर्चना म्हणते की,'भारतातील हिंदू धार्मिक स्थळे लुटीची अड्डा बनली आहेत. तिरुपती बालाजीमध्ये धर्माच्या नावाखाली महिलांसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या TTD च्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी. मी आंध्र सरकारला विनंती करतो आणि व्हीआयपी दर्शनाच्या नावावर एका व्यक्तीकडून 10,500 घेतो. त्याची लूट थांबवा.' अभिनेत्रीने 5 सप्टेंबरला ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

टीटीडीने आरोप फेटाळला

तर तिरुमला तिरुपती देवस्थानने अर्चना गौतमने व्हायरल व्हिडिओवर केलेले आरोप फेटाळले आहेत. उलट अभिनेत्रीनेच त्याच्यावर हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. अर्चनाने पोलिसांकडे केलेली तक्रारही खोटी असल्याचं म्हटलं आहे.