Anantnag Encounter : चौथ्या दिवशीही संघर्ष सुरुच; अनंतनागमध्ये दहशतवाद्यांवर लष्कराकडून रॉकेट लॉन्चरनं हल्ले

Anantnag Encounter : मागील चार दिवसांपासून सुरु अणारा लष्कर आणि दहशतवाद्यांमधील संघर्ष अद्यापही सुरु असून, आता दहशतवाद्यांवर संरक्षण दलांकडून चारही बाजूंनी हल्ला चढवला जात आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 16, 2023, 07:47 AM IST
Anantnag Encounter : चौथ्या दिवशीही संघर्ष सुरुच; अनंतनागमध्ये दहशतवाद्यांवर लष्कराकडून रॉकेट लॉन्चरनं हल्ले  title=
Anantnag Encounter continues for forth day latest update

Anantnag Encounter : (Jammu Kashmir) जम्मू काश्मीरच्या अनंतनाग येथे गेल्या काही दिवसांपूर्वीच लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये संरक्षण दलातील तीन बड्या अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. तर, सैन्याचे जवान जखमीही झाले. जहशतवाद्यांसोहत सुरु असणारा हा संघर्ष अद्यापही सुरुच असून सलग चौथ्या दिवशी अनंतनागला छावणीचच रुप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार कोकेरनाग येथे असणाऱ्या घनदाट वनांमध्ये 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याचं म्हटलं जात असून, सध्या या दहशतवाद्यांना लष्कर आणि इतर सहकारी संरक्षण दलांनी चारही बाजुंनी घेरलं आहे. हाती घेतलेली ही मोहिम लवकरात लवकर फत्ते करत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी म्हणून लष्कराकडून दहशतवादी लपून बसेलल्या भागांवर रॉकेच लॉन्चरनं हल्लेही केले जात आहेत. शिवाय ड्रोनमधून  या भागांवर स्फोटकं टाकली जात आहेत. 

काश्मीरच्या एडीजीपींनी या मोहिमेसंदर्भात सोशल मीडियावर माहिती देताना स्पेशल इनपुटच्या आधारे ही मोहिम सुरु असल्याचं स्पष्ट करत लवकरच दहतवादी संरक्षण दलांच्या ताब्यात असतील असं स्पष्ट केलं. 

पाकिस्तानात रचला गेला हल्ल्याचा कट... 

काश्मीरमधील या हल्ल्याचा कट पाकिस्तानाच रचला गेल्याचा खळबळजनक खुलासा झाला असून, क्रॉस बॉर्डर कॉल इंटरसेप्टच्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे. जिथं दहशतवाद्यांनी सीमेपलीकडूनच भारतात घुसखोरी करण्याचा कट रचल्याचं उघड झालं. भारताच्या प्रतिनिधीत्त्वाच पार पडलेल्या G20 संमेलनाच्या यशस्वी आजोयनामुळं पाकिस्तानचा तिळपापड झावा आणि त्यामुळं ही कूटनिची रचली गेली. मंगळवार- बुधवारी रात्रीच्या सुमारास अनंतनाग येथे दहशतवादी लपून असल्याची माहिती मिळताच लष्करानंही सूत्र चाळवली आणि त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा रचला. 

हेसुद्धा वाचा : गुन्हेगार लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी? सुप्रीम कोर्टात अहवाल सादर

 

तीन अधिकारी शहीद... 

बुधवारी अनंतनाग एनकाऊंटरदरम्यानच लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांतील तीन अधिकारी शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं आणि संपूर्ण देश हळहळला. यामध्ये 19 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष धौंचक आणि डीएसपी हुमायूं भट्ट शहीद धाले. यामध्ये एका जवानालाही वीरमरण आल्याची माहिती समोर आली. पण, अद्यापही या जवानाबाबतची सविस्तर माहिती प्रतिक्षेतच आहे. दरम्यान, आता देशासाठी प्राण त्यागणाऱ्या या वीरांच्या त्यागाचा सूड उगवण्यासाठीच लष्कर प्रयत्नशील असून, ही मोहिम फत्ते करणं हे एकमेव लक्ष्य त्यांनी डोळ्यांसमोर ठेवलं आहे.