चिमुकलीला रोलकोस्टरवर बसण्याचा हट्ट पडला महागात, नक्की काय घडलं? पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  

Updated: Aug 14, 2022, 05:11 PM IST
चिमुकलीला रोलकोस्टरवर बसण्याचा हट्ट पडला महागात, नक्की काय घडलं? पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केले जातात. अनेकवेळा सोशल मीडियावर खतरनाक आणि धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. अम्युझमेन्ट पार्कमधले तर एकना एक व्हिडीओ रोज व्हायरल होताना दिसतो. राईड्सचे व्हिडिओही शेयर केले जातात. या राईड्सवर भल्याभल्याना घाम सुटतो तर मुलांना भीती वाटणे स्वाभाविक आहे. असाच काहीसा प्रकार या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक वडील आणि त्यांची मुलगी राईडवर बसल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा : 90 सेकंदात रिक्षा चालकाला 17 वेळा महिलेने लगावली कानशिलात, धक्कादायक व्हिडीओ Viral

या व्हायरल विडिओमध्ये  मुलीने तिच्या वडिलांना या राईडवर  बसण्याचा आग्रह केला होता, त्यानंतर वडील आणि मुलीने एकत्र या राईडचा आनंद घेण्याचे ठरवले. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की राईड दरम्यान मुलगी अनेक वेळा बेशुद्ध झाली. ही मुलगी बऱ्याचवेळा बेशुद्ध होते आणि पुन्हा उठते असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. राइड राउंड सुरू होताच, मुलगी खूप आनंदाने किंचाळताना आनंद व्यक्त करताना दिसते पण त्याच सोबत ती अनेकदा बेशुद्ध देखील होताना दिसते, परंतु बेशुद्ध होऊन सुद्धा ती लगेच उठते आणि उत्साहात ओरडते आणि नंतर पुन्हा बेशुद्ध होते. राईड संपेपर्यंत हे चक्र सुरु राहतं. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू येत आहे.

आणखी वाचा : राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांकडून मोठी अपडेट

आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

हा व्हिडिओ पहिल्यांदा Tiktok वर शेअर करण्यात आला होता, जिथे तो 5 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एवढंच नाही तर हजारो लोकांनी (Social Media Users) ने या फनी व्हिडिओला लाईकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.