Amarnath Yatra 2023 : बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी यात्रेकरु रवाना; यावर्षी भक्तांना हेल्मेट घालून घ्यावं लागणार दर्शन?

Amarnath Yatra 2023: चारधाम यात्रेमागोमागच आता जम्मू- काश्मीरमधील अमरनाथ यात्राही सुरु झाली असून, भक्तांची पहिली तुकडी अमरनाथ धामच्या दिशेनं रवाना झाली आहे.   

सायली पाटील | Updated: Jun 30, 2023, 09:26 AM IST
Amarnath Yatra 2023 : बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी यात्रेकरु रवाना; यावर्षी भक्तांना हेल्मेट घालून घ्यावं लागणार दर्शन? title=
Amarnath Yatra 2023 First Batch Of devotees Leaves From Jammu in Tight Security latest updates

Amarnath Yatra 2023 Latest Updates: बाबा बर्फानी अर्थात अमरनाथ धाम येथे असणाऱ्या पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक अमरनाथ यात्रेसाठी मार्गस्थ होताना दिसत आहेत. मोठ्या उत्साहात आणि भाविकांनी केलेल्या जयघोषात या यात्रेची सुरुवात झाली असून, शुक्रवारी भल्या पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास (Shri AMarnath Shrine Board) अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा यांनी श्रद्धाळुंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून यात्रेसाठी रवाना होण्याचा इशारा दिला. ज्यानंतर कडेकोट लष्करी बंदोबस्तामध्ये हे यात्रेकरु अमरनाथ धामच्या दिशेनं रवाना झाले. 

यंदाच्या वर्षी 1 जुलै रोजी अमरनाथ यात्रेची सुरुवात होणार असून, या यात्रेसाठी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. बहुतांश भागांमध्ये सध्या अतीवृष्टीमुळं भूस्खलनाचंही संकट ओढावत असून, यासाठी बचाव पथकंही तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे. अमरनाथ यात्रेच्या वेळी मागील वर्षी पवित्र गुफेपाशी झालेल्या ढगफुटीसदृश घटनेमुळं यंदाच्या वर्षी प्रशासन सतर्कता बाळगताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा दीर्घकाळापर्यंत चालणार असून, आतापर्यंत यात्रेसाठी तीन लाख यात्रेकरुंनी नोंदणी केली आहे. 

 

यंदाच्या वर्षी यात्रेकरु वापरणार हेल्मेट?

अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरुंचा सर्वात मोठा तळ पहलगाम येथील कँप नूनवन येथे लागला आहे. दरम्यान, यात्रा मार्गावर भूस्खलनाच्या घटना पाहता यात्रेकरुंना सुरक्षित ठेवण्याच्या हेतूनं श्राईन बोर्डानं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ज्याअंतर्गत यात्रामार्गादरम्यान प्रवाशांना हेल्मेटचा वापर करणं बंधनकारक असेल. खच्चरवरून जाणाऱ्या भाविकांनाही हेल्मेट वापरणं सक्तीचं असेल. अमरनाथ श्राईन बोर्डाच्या वतीनं हेल्मेट नि:शुल्क उपलब्ध करून दिली जाणार आहे.

काय आहेत यात्रेची वैशिष्ट्य? 

यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच अमरनाथ यात्रेचा कालावधी दरवर्षीपेक्षआ जास्त असेल. जिथं ही यात्रा 62 दिवस सुरु राहील आणि अनेक यात्रेकरुंना बाबा बर्फानीचं दर्शन घेता येईल. यात्रेसाठी यंदाच्या वर्षी 70 वर्षे इतकी वयोमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. बालतालवरून दोन मार्गांनी यात्रेकरु यात्रा करू शकणार आहेत. ज्यामध्ये 14.5 किमीचं अंतर त्यांना ओलांडावं लागणार आहे. चंदनवाडीहून साधारण 13 हजार फुटांच्या उंचीवर असणाऱ्या पविस्तर गुफेपाशी पोहोचण्यासाठी यात्रेकरुंना 32 किमीचं अंतर ओलांडावं लागणार आहे. यंदाच्या वर्षी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनानं यात्रेच्या मार्गांवर बऱ्याच सुधारणा केल्यामुळं यात्रा अधिक सुकर होईल. 

Monsoon Updates : आठवड्याचा शेवटही पावसानं; पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार 

 

अमरनाथ यात्रेदरम्यान काही खाद्यपदार्थांच्या वापरावरही यंदा निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये पिज्जा, बर्गर, स्टफ परांठा, डोसा, बटर असणारा ब्रेड, लोणचं, चटणी, तळलेले पापड, चाऊमीन, फ्राईड राईस, पुलाव अशा पदार्थांटा समावेश आहे. भाविकांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत श्राईन बोर्डानं तांदळापासून तयार करण्यात आलेलेल्या पदार्थांसोबत धान्य, डाळी, भाज्या आणि सॅलड अशा पर्यायांचा विचार अंमलात आणला आहे.