Amarnath Yatra 2022: अमरनाथमध्ये गुहेजवळ ढगफुटी, दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती

आताची मोठी बातमी, घटनास्थळी गोंधळ, बचाव पथकं घटनास्थळी दाखल

Updated: Jul 8, 2022, 07:39 PM IST
Amarnath Yatra 2022: अमरनाथमध्ये गुहेजवळ ढगफुटी, दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती title=

Amarnath Yatra 2022: जम्मू-काश्मीरमधील बाबा अमरनाथच्या गुहेजवळ ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. ही घटना संध्याकाळी 5.30 वाजताची असून अपघातानंतर सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.  घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून एनडीआरएफ आणि इतर संस्थांच्या मदतीने बचाव कार्य केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ढगफुटीच्या घटनेनंतर यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली असून या दुर्घटनेमुळे तिथल्या तंबूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत 2 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

आयटीबीपीची टीमही घटनास्थळी पोहोचली असून या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढगफुटीनंतर आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाण्यात बुडाला असून जखमींना विमानाने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.