अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, 15 जणांचा मृत्यू

Amarnath News: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. 

Updated: Jul 9, 2022, 08:24 AM IST
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, 15 जणांचा मृत्यू title=

श्रीनगर : Amarnath News: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. अमरनाथमध्ये गुहेजवळ झालेल्या ढगफुटीतील मृतांची संख्या 15वर पोहोचली आहे. अजूनही 40 भाविक बेपत्ता आहेत. काल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अमरनाथच्या गुहेपासून 2 किमी अंतरावर ही ढगफुटी झाली. यामुळे भाविकांचे तंबू वाहून गेले. यामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाही अमरनाथ यात्रेसाठी भाविक अजुनही काश्मीरमध्ये पोहोचत आहेत. त्यातील काही भाविकांशी सांगितले की, आम्ही ढगफुटीमुळे आलेले संकट आणि नुसानीचे चित्र पाहिले. पण यात्रेमुळे आणि श्रद्धेमुळे आमचे मनोबल खचले नाही आणि आम्हाला प्रवास करायचा आहे. प्रशासनाने परवानगी दिली तर पुढे जाऊन दर्शन घ्यायचे आहे.

शुक्रवारी संध्याकाळी पवित्र गुहेजवळ ढग फुटी झाली. ढगफुटीमुळे येथे 10 जणांचा मृत्यू झाला होता. यासोबतच अनेक तंबू आणि नांगरही वाहून गेले. मृतांमध्ये 3 महिलांसह 10 जणांचा समावेश होता. कोण आणि कुठून आले, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. नैसर्गिक अपघातानंतर बचावकार्य सुरु आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, NDRF प्रमुख अतुल करवाल यांनी सांगितले की, अमरनाथ गुहेच्या खालच्या भागात संध्याकाळी 5.30 वाजता ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली. आमची 1 टीम गुहेजवळ तैनात आहे, त्या टीमने तातडीने बचाव कार्य सुरु केले. ढग फुटले त्यावेळी गुहेजवळ 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते. 

या घटनेत 3 महिलांसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 35 ते 40 यात्रेकरु अजूनही अडकल्याचे वृत्त आहे. पवित्र गुहेच्या एक ते दोन किलोमीटरच्या परिघात ढगफुटीची घटना घडली. डोंगरावरून आलेल्या जोरदार प्रवाहाने आलेल्या पाण्याने भाविकांसाठी उभारलेले सुमारे 25 तंबू आणि दोन ते तीन नांगर वाहून गेले. अनेक यात्रेकरू बेपत्ता असून जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेल्याची भीती आहे.

अमरनाथ यात्रा पुढे ढकलली

या घटनेनंतर अमरनाथ यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, पवित्र गुहेजवळ ढगफुटीमुळे काही नांगर आणि तंबू जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.  लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात असून त्यांना छावण्यांमध्ये नेण्यात येत आहे. जखमींना विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Amarnath news:   हेल्पलाइन नंबर  
NDRF :
011-23438252
011-23438253

Kashmir Divisional Helpline
0194-2496240

Shrine Board Helpline
0194-2313149