'पुलवामा हल्ल्यानंतर काहींना दु:ख झालं नव्हतं हे देश विसरणार नाही'

दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन

Updated: Oct 31, 2020, 10:56 AM IST
'पुलवामा हल्ल्यानंतर काहींना दु:ख झालं नव्हतं हे देश विसरणार नाही' title=

अहमदाबाद : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना स्टॅच्यू ऑफ यूनिटी येथे जाऊन श्रद्धांजली वाहीली. यावेळी मोदींनी 'राष्ट्रीय एकता दिवस' परेडकडून मानवंदना देखील स्वीकारली. सीमेवर भारताची नजर आणि दृष्टीकोन बदलला आहे. आमच्याकडे डोळे वटारुन पाहणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जातंय. काही देश उघडपणे दहशतवादाचे समर्थन करतायत. हा एक वैश्विक चिंतेचा विषय आहे. जगातील सर्वांना दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. दहशतवाद आणि हिंसाचाराने कोणाचं भल होणार नाही असेही ते म्हणाले. 

काहीजण पुलवामा हल्ल्यासंदर्भात राजकारण करत होते. पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाले तरी काहींना दु:ख झालं नव्हत हे देश विसरणार नाही. त्यावेळी हे लोक केवळ राजकारण करत होते. त्यांनी राष्ट्रहिताबाबत राजकारण करु नये असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. दरम्यान पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत इम्रान खानच्या नेतृत्वात भारताला उत्तर दिल्याचे म्हटले. 

भारत खूप दिवसांपासून दहशतवादापासून पीडित आहे. भारताच्या अगणित जवान आणि जनतेने आपली माणसं गमावली आहेत. संपूर्ण जगाने दहशतवादाविरोधात एकत्र यायला हवे असे पंतप्रधान म्हणाले.