Ajmer Sex Scandal: देशातील सर्वात मोठा सेक्स स्कँडल अजमेर ब्लॅकमेल-रेप कांडमध्ये 32 वर्षांनंतर कोर्टाने आपला निर्णय सुनावला आहे. अजमेरच्या स्पेशल पॉक्सो कोर्टाच्या न्यायाधीशांनी 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 5-5 लाखांचा दंडदेखील ठोठावला आहे. 32 वर्षांपूर्वी शहरातील 100 हून अधिक कॉलेजच्या विद्यार्थिनींवर सामूहिक बलात्कार करण्यात आले होते.
नफीस चिश्ती, नसमी उर्फ टारझन, इकबाल, भाटी, सलीम चिश्ती, सोहिल गनी आणि सय्यद जमीर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोषींविरोधात 2001मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. कोर्टात ज्यावेळी शिक्षा सुनावली तेव्हा कोर्टात 6 आरोपी उपस्थित होते. तर एक आरोपी इकबाल भाटीला रुग्णालयातून दिल्ली ते अजमेरपर्यंत आणण्यात आलं.
अजमेरच्या भयानक प्रकाराची सुरुवात 1992च्या एप्रिल-मे महिनेच्या सुरुवातीपासून झाली होती. अजमेरच्या एका नामांकित गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थिनींचे अचानक न्यूड फोटो शहरात व्हायरल व्हायला लागले. त्यानंतर अचानक अजमेरमध्ये दैनिक नवज्योती वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीचा मथळा होता. 'श्रीमंताच्या मुली ब्लॅकमेलिंगला बळी' ही बातमी प्रसिद्ध होताच शहरात एकच खळबळ माजली. या बातमीबरोबरच एक एक फोटोदेखील समोर यायला लागले.
सेक्स हँडलमध्ये एक दोन नव्हे तर शंभर विद्यार्थिनींचे न्यूड फोटो होते. यातील अनेक विद्यार्थिनी मोठ्या प्रतिष्ठित कुटुंबातील होते. हे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण देशात एकच गदारोळ माजला. त्यावेळी राजस्थानमध्ये भैरोसिंह शेखावत यांचे सरकार होते. शेखावत यांनी हे प्रकरण सीआयडी व सीबीआयकडे सोपवलं होतं.
सीबीआय आणि सीबीआयच्या तपासात जी माहिती समोर आली त्यामुळं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं. आरोपींनी अजमेरच्या एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलासोबत मैत्री केली होती. त्यानंतर त्याच्यासोबत गैरवर्तन करुन त्याचे अश्लील फोटो काढले. या फोटोंच्या माध्यमातून व्यापाऱ्याच्या मुलाला ब्लॅकमेल करुन आरोपींनी त्याच्या प्रेयसीला पोल्ट्री फॉर्मवर बोलवले.
आरोपींनी त्याच्या प्रेयसीवर बलात्कार करुन तिचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर त्या फोटोंवरुन ते तिला ब्लॅकमेल करु लागले. त्यांनी त्या तरुणीला तिच्या आणखी मैत्रिणींना बोलवण्यास सांगितली. बदनामीपासून वाचण्यासाठी त्या तरुणीने तिच्या काही मैत्रिणीना आरोपींकडे घेऊन जाऊ लागली. तिथेही त्यांच्यावर बलात्कार करुन अश्लील फोटो काढण्यात आले. त्यानंतर याच फोटोंच्या आधारे अन्य तरुणींना शिकार बनवले जायचे.
ब्लॅकमेलिंग करुन आरोपींनी शहरातील 100 हून अधिक विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. असं म्हणतात की, त्यावेळी आरोपींचा फियाट कार गर्ल्स कॉलेजच्या बाहेर उभी असायची. ते दर दिवशी वेगवेगळ्या मुलींना शहराच्या बाहेर नेऊन त्यांच्यावर बलात्कार करत असतं. शहरातील एका फोटो स्टुडिओच्या लॅबमध्ये मुलींची नग्न छायाचित्रे काढण्याचे काम आरोपीने दिले होते. मुलींची नग्न छायाचित्रे पाहून लॅबमध्ये काम करणाऱ्या टेक्निशियनचे नियत बिघडली. ज्या व्यक्तीने ही छायाचित्रे काढली त्यानेच मुलींना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी काही जणांवर 1998 मध्ये खटला चालला होता.