Recharge Price : यूझर्सना झटका देणारी बातमी, रिचार्ज महागणार?

लवकरच यूझर्सना प्रीपेड रिचार्जसाठी (Prepaid Recharge) जास्त पैसे मोजावे लागू शकतात. 

Updated: Nov 23, 2022, 07:42 PM IST
Recharge Price : यूझर्सना झटका देणारी बातमी, रिचार्ज महागणार? title=

मुंबई : टेलिकॉम कंपन्या (Telcom Company) यूझर्सना झटका देण्याच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसात रिचार्ज प्लान्स (Recharge Plans) महागण्याची शक्यता आहे. कंपन्यांकडूनच तसे संकेत देण्यात आले आहेत. याआधी कंपन्यांकडून गेल्या वर्षी रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. नुकतंच एअरटेलने मिनिमम रिचार्ज (Airtel Minimum Recharge) प्लानच्या किंमतीत वाढ केलीय. हरियाणा आणि ओडीसा या 2 सर्कलसाठी ही वाढ करण्यात आली होती. (airtel jio vi telecom companies may be price hike in prepaid recharges)

आतापर्यंत यूझर्सना सिम कार्ड एक्टिव्ह ठेवण्यासाठी किमान 99 रुपयांचा रिचार्ज करायला लागायचा.  मात्र आता किमान रिचार्ज करण्यासाठी 155 रुपये मोजावे लागणार आहेत. सूत्रांनुसार, येत्यात काही दिवसांमध्ये एअरटेल मिनिमम रिचार्ज किंमती वाढवू शकते. याशिवाय जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांनी रिचार्ज प्लानमध्ये काही बदल केले आहेत.

जिओने (Jio) डीझनी + हॉटस्टार सब्सक्रिप्शन असणारे सर्व रिचार्ज प्लान्स रिमूव्ह केले आहेत. तर एअरटेलनेही 2 प्लान्सचा अपवाद वगळता सर्वच प्लान्समधून या सेवा हटवल्या आहेत. थोड्यक्यात काय तर यूझर्सना तेवढ्याच पैशात कमी फायदे मिळतील. 

दरम्यान एअरटेलने गेल्या वर्षी मिनिमम रिचार्जच्या किंमतीत 20 रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे यूझर्सना 79 ऐवजी 99 रुपयांचा मिनिमिम रिचार्ज करावा लागतोय. जिओनेही रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानुसार यंदाही पुन्हा एकदा रिचार्जचे दर वाढण्याची शक्यता आहे.