नवी दिल्ली : सरकारी हवाई कंपनी एअर इंडियाने शुक्रवारी म्हटले की, त्यांच्यावर सायबर ऍटॅक झाला आहे. ज्यात 45 लाख प्रवाशांचा डेटा चोरी झाल्याची शक्यता आहे. हा देशातील सर्वात गंभीर सायबर ऍटॅक समजला जात आहे. या ऍटकमध्ये पासपोर्ट आणि क्रेडिट कार्डशी संबधित माहिती सामाविष्ट आहे.
एअर इंडियाने या बाबतीत ट्वीट करून माहिती दिली आहे. त्याच्या सर्व्हरवर ऍटॅक झाला आहे. ज्यात प्रवाशांची माहिती चोरण्यात आली आहे. प्रवाशांचे नाव, जन्मतारिख, कॉन्टॅक्ट डिटेल्स, पासपोर्टची माहिती आणि टिकिटांच्या माहितीचा सामावेश आहे.
तुमचाही डेटा चोरी झाला का?
जर तुम्ही 26 ऑगस्ट 2011 ते 20 फेब्रुवारी 2021 दरम्यान, प्रवास केला असेल, तर हे स्पष्ट आहे की, तुमचा डेटा चोरी झाला आहे. जो आता हॅकर्सजवळ आहे. त्यात प्रवाशांचे नाव, पासपोर्ट नंबर, टिकिटांची माहितीचा सामावेश आहे. एअर इंडियाने आपल्याकडून त्या ग्राहकांना मेल पाठवण्यात आला आहे. ज्यांची माहिती चोरली गेली आहे.
एअर इंडियाने म्हटले आहे की, क्रेडिट कार्डचा सीवीवी नंबर एअर इंडियाकडे नसतो. तसेच या सायबर ऍटॅकच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तरी प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी पासवर्ड शक्यतो बदलून घ्यावेत.