भाज्यांनंतर 'या' जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले, जाणून घ्या !

 सर्वसामान्यांचे आर्थिक गणित आधीच गडबडलंय. 

Updated: Dec 7, 2020, 10:31 PM IST
भाज्यांनंतर 'या' जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले, जाणून घ्या ! title=

नवी दिल्ली : डाळींच्या वाढलेल्या किंमती आणि भाज्यांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित आधीच गडबडलंय. यातच डिसेंबरमध्ये दूध, साखर आणि चहापत्तीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय. ग्राहक मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर नव्या दरांची यादी जाहीर करत यासंदर्भातील माहिती दिली. सोमवारी किरकोळ बाजारात साखर तीन रुपयांनी वाढून ४३ रुपये ३८ पैसे इतकी झाली. सुट्या चहाच्या दरात ११.५७ टक्क्यांनी वाढ झाली तर चहापत्तीचा दर २७.५८ रुपयांनी वाढून २६६ रुपयांवर पोहोचला. 

Sugar Price Hike

याशिवाय दूधाचे भाव देखील सरासरी ७ टक्क्यांनी वाढलेले दिसले. दूधाचा दर ३.२६ पैशांनी वाढून ५० रुपये प्रति लीटरवर पोहोचले. तर भाज्यांच्या दराबद्दल बोलायच झाल्यास ३० नोव्हेंबरपासून ७ डिसेंबरपर्यंत टॉमेटो ३७.८७ टक्क्यांनी महागलाय. किरकोळ बाजारात आज टॉमेटोचा भाव साधारण ४९.८८ रुपये प्रति किलो होता. 

खाण्याच्या तेलाच्या भावात उतार पाहायला मिळाला. पाम तेलाचा दर १०२ रुपयांनी कमी होऊन ९२ रुपयांपर्यंत पोहोचला. सुर्यफूल तेलाची किंमत १२४ रुपयांनी कमी होऊन १२३ रुपये झाली. तर शेंगदाणा तेलाची किंमत १५६ रुपयांहून १४५ आणि मोहरीचे तेल देखील १३५ हून १३२ रुपये प्रति लीटर झाले. 

Tea price hike

गहू, तांदूळ आणि मैद्याचे भावही खाली आले आहेत. गव्हाचे दर २९ रुपयांहून घसरुन २४ रुपयांवर घसरले आहेत. किरकोळ बाजारात पीठाची किंमत ३२ रुपयांवरुन २८ रुपयांवर गेली आहे. तांदळासोबत चणा डाळ आणि उडीद डाळीच्या दरामध्येही घट झाली आहे.

Milk Price Hike