निकालांनंतर प. बंगालमध्ये राजकीय हिंसा, बलात्कार अद्यापही सुरूच, लाखापेक्षा जास्त लोकांचे भीतीपोटी पलायन

 पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुक निकालांनंतर सुरू झालेली हिंसा अद्यापही सुरू आहे

Updated: May 22, 2021, 04:43 PM IST
निकालांनंतर प. बंगालमध्ये राजकीय हिंसा, बलात्कार अद्यापही सुरूच, लाखापेक्षा जास्त लोकांचे भीतीपोटी पलायन title=

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुक निकालांनंतर सुरू झालेली हिंसा अद्यापही सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या हिंसेनंतर लोकं पलायन करत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत ही राज्य प्रायोजित गुंडांकडून सुरू असलेली हिंसा असल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे पोलीस या घटनांकडे दूर्लक्ष करीत आहेत. पोलीस हिंसेत बाधित होणाऱ्या लोकांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याचिकेत प्रश्न उपस्थित
याचिकेत भीतीपोटी लोकांना पलायन करणे भाग पडत आहे. साधारण 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी पलायन केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकते पश्चिम बंगालमधील राज्य प्रयोजित हिंसा ही मानवी हक्कांचा मुद्दा आहे. असं म्हटलं गेलं आहे. पलायन करणाऱ्या लोकांमुळे मुलभूत हक्कांचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ अधिवक्त पिंकी आनंद यांनी याप्रकरणाची तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली आहे.

केंद्र सरकारकडे मागणी
याचिकेत म्हटले गेले आहे की, केंद्र सरकारने संविधानाच्या 355 व्या कलमाअंतर्गत राज्याला आंतरिक अशांततेपासून वाचवणे गरजेचे आहे. राज्यात राजकीय हिंसा, ठरवून केलेल्या हत्या आणि बलात्कार आदी घटनांच्या चौकशीसाठी एसआटी गठीत करण्यात यावी. पलायन करून बाधित झालेल्या कुटूंबांसाठी सरकारने मदत जारी करावी.

सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी करणार आहे.