बायको माहेरी गेल्यानंतर मुलीची बलात्कार करुन हत्या

आपली बदनामी होणार या भितीने गुरमेरने  मुलीची गळा दाबून हत्या केली.

Updated: Nov 5, 2018, 04:16 PM IST
बायको माहेरी गेल्यानंतर मुलीची बलात्कार करुन हत्या  title=

बिजनौर : बिजनौर जिल्ह्यातील खादर गावामध्ये शनिवारी एका व्यक्तिने 12 वर्षाच्या सावत्र मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. आदेश नावाची महिला आपल्या 3 मुलांना तिच्या सावत्र वडीलांकडे सोडून माहेरी गेली होती. शनिवारी रात्री गुरमेरने आदेशची मुलं (रौनक आणि शुभम) यांना एका खोलीत आणि अल्पवयीन मुलीला वेगळ्या खोलीत झोपायला पाठवलं.

बापाने दिली कबुली 

मध्यरात्री सर्वजण झोपल्यावर गुरमेरने सावत्र मुलीसोबत बलात्कार केला. मुलगी आपल्या आईला याबद्दल सांगेल अशी भीती त्याला वाटू लागली. आपली बदनामी होणार या भितीने गुरमेरने  मुलीची गळा दाबून हत्या केली. शेजारी राहणाऱ्यांपर्यंत ही बातमी पसरली. त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं.

पोलिसांनी गुरमेरची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. आदेश हिच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर ती गुरमेरसोबत राहत होती.

याआधी अशीच घटना 

याआधी उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातही पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून एका व्यक्तिवर बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. आश्चर्यकारक म्हणजे या प्रकरणातील पीडितेची आई असलेल्या आदेशच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती.

15 जुलैला अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याची घटना समोर आल्याचे कोतवाली कर्वीचे निरीक्षक अनिल सिंह यांनी सांगितलं.

मुलीचे किंचाळणे ऐकून आई घरात पोहोचली तेव्हा बाप जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून फरार झाला होता.