Provident Fund: तुमच्या EPFमध्ये होणार 66% वाढ, तुम्ही करो़डपती बनून निवृत्त व्हाल

नवीन वेतन संहितेमध्ये असे नमूद केले आहे की, कर्मचाऱ्यांचा मूलभूत पगार त्याच्या सीटीसीच्या (CTC) 50 टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही.

Updated: Mar 22, 2021, 11:20 PM IST
Provident Fund: तुमच्या EPFमध्ये होणार 66% वाढ, तुम्ही करो़डपती बनून निवृत्त व्हाल title=

मुंबई: Provident Fund: नवीन वेतन संहिता गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे, याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे आणि याबद्दल मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे, परंतु केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जेव्हा जेव्हा नवीन वेतन कोड लागू केला जाईल, तेव्हा ते खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट असेल.

नवीन वेतन संहितेमध्ये असे नमूद केले आहे की, कर्मचाऱ्यांचा मूलभूत पगार त्याच्या सीटीसीच्या (CTC) 50 टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही. याचा परिणाम कर्मचार्‍याच्या ईपीएफ EPF (Employees Provident Fund)  च्या रकमेवरही होईल. कर्मचारी आणि कंपनी दरमहा मूलभूत पगाराच्या 12-12 टक्के वाटा PFला देतील.

EPF खाताधारकांना सूट

ईपीएफओच्या (EPF ) नियमांनुसार, जर तुम्ही पीएफचे सर्व पैसे काढून घेतले तर त्यावर कर आकारला जात नाही. म्हणूनच नवीन वेतन संहिता लागू झाल्यानंतर मूळ वेतन 50 टक्क्यांच्या वर जाईल आणि त्यावर पीएफ कापले जाईल, त्यामुळे पीएफ फंडही जास्त होईल. म्हणजेच जेव्हा  कर्मचारी रिटायर्ड होईल, तेव्हा त्याच्याकडे पूर्वीपेक्षा जास्त पीएफ शिल्लक असेल.

नवीन वेतन नियमानुसार पीएफ

समजा तुम्ही 35 वर्षांचे आहात आणि तुमचा पगार महिन्याला 60 हजार रुपये आहे. या प्रकरणात, वार्षिक वाढीची रक्कम दहा टक्के  विचारात घेतल्यास, सध्याचा पीएफ व्याज दर 8.5% रिटायरमेंटपर्यंत म्हणजेच 25 वर्षानंतर तुमची एकूण PF रक्कम  1 कोटी 16 लाख 23 हजार 849 रुपये असेल.

जुन्यापेक्षा पीएफ फंड 66% जास्त असेल

आताच्या पीएफ शिल्लकची तुलना ईपीएफ योगदानाशी केली तर, रिटायरमेंट नंतर पीएफ रक्कम. 69 लाख 74 हजार 309 रुपये आहे. म्हणजेच नवीन वेतन नियमाद्वारे पीएफ शिल्लक जुन्या फंडापेक्षा कमीत कमी 66 टक्के जास्त असेल.

ग्रेज्युटी

नवीन वेतन संहितेनुसार कर्मचार्‍यांचे ग्रेज्युटीही बदलली जाईल. ग्रेज्युटीची गणना आता मोठ्या बेसवर होईल, ज्यात मूलभूत वेतन तसेच बरोबर इतर वेतन जसे प्रवास, विशेष भत्ता इत्यादी समाविष्ट आहेत. हे सर्व कंपनीच्या ग्रेज्युटी खात्यात जोडले जाईल.