भारतात काम करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्या कोणत्या, जाणून घ्या...

आपल्या 'हार्ड वर्क'ची 'गुंतवणूक' याच कंपन्यांत करा...

Updated: Dec 14, 2018, 10:37 AM IST
भारतात काम करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्या कोणत्या, जाणून घ्या...  title=

मुंबई : आपण एखाद्या नावाजलेल्या आणि आपल्या फायद्यासोबत कर्मचाऱ्यांच्या हिताचाही विचार करणाऱ्या कंपन्यांसोबत काम करायला कुणाला आवडणार नाही... नक्कीच तुम्हालाही आवडेल. आपल्या 'हार्ड वर्क'ची कोणत्या कंपन्यांत 'गुंतवणूक' कराल, जेणेकरून तुम्हालाही 'परतावा' म्हणून आपल्या कामाचं समाधान मिळू शकेल, अशा कंपन्यांचा एक भाग होणं तुम्हालाही आवडेल... त्यातही तुम्ही काम करण्यासाठी नवीन संधीच्या शोधात असाल तर अशा कोणत्या कंपन्या आहेत, हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या

भारतात टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीत नोकरी करताना 'अॅडोब' (Adobe) ही कंपनी सर्वोत्तम ठरलीय. त्यानंतर नंबर लागतो तो एनविडिया (Nvidia) आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) या कंपन्यांचा... आंतरराष्ट्रीय रोजगार वेबसाईट 'इनडीड'नं नुकत्याच आपल्या एका संशोधनातून ही माहिती दिलीय.

'इनडीड'ची यादी जाहीर

'इनडीड'नं टॉप रँकिंग वर्क प्लेससाठी अर्थात भारतातील काम करण्यासाठी उत्कृष्ट कंपन्यांची एक यादीच तयार केलीय. यासाठी त्यांनी काही भारतीय कर्मचाऱ्यांसोबत याचा अभ्यासही केला. या यादीत आंतरराष्ट्रीय कंपन्यांचंच वर्चस्व दिसून आलंय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो या यादीत १० व्या स्थानवर आहे... सोबतच या यादीत समाविष्ट असलेली इस्रो ही एकमेव सरकारी कंपनी आहे.

टीसीएसचाही समावेश

टॉप १० कंपन्यांच्या यादीत सॅप, अकामई टेक्नॉलॉजीज, व्हीएमवेयर, सिस्को, इंटेल आणि सिट्रिक्स सिस्टम्स इंक यांचा समावेश आहे. या रिपोर्ट 'सर्वोच्च पाच कार्यस्थळांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचा (एमएनसी) समावेश आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की, नोकरी शोधताना तरुण आंतरराष्ट्रीय कंपन्यांना प्राधान्य देतात'. 

टॉप १० कंपन्यांमध्ये ई-कॉमर्स कंपनी मिंत्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांसारख्या भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. 

यापूर्वी 'फॉर्च्युन'द्वारे जाहीर करण्यात आलेल्या यादीत काम करण्यासाठी 'सेल्सफोर्स'नं सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोत्तम कार्यस्थळ म्हणून मान मिळवलाय. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 'हिल्टर', तिसऱ्या क्रमांकावर 'मार्स' आणि चौथ्या क्रमांकावर 'इट्युट इंक' यांना स्थान मिळालं.