नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. अचानक झालेल्या स्फोटामध्ये दोन मजल्याची इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत 14 जणांना ढिगाऱ्यातून काढण्यात यश मिळालं आहे. यामध्ये 3 लहान बालकांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Gonda: Two adjacent houses collapsed after a cylinder blast at Tikri village in Wazir Ganj area last night.
"14 people have been rescue, 7 of them have been declared dead and 7 others are undergoing treatment at a hospital," said SP Santosh Kumar Mishra. pic.twitter.com/V6wGRwzilx
— ANI UP (@ANINewsUP) June 2, 2021
दरम्यान घटनेची माहिती मिळताचं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. लोकांना ढिकाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तर 7 जणांना मृत घोषित केलं.
अद्यापही याठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. घरातील सिलेंडरचा स्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांसह फॉरेंसिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे.