पतीसह दुर्गापूजेसाठी पोहोचल्या संसदेतील ग्लॅमरस खासदार नुसरत जहाँ

त्या कायमच चर्चेत असतात... 

Updated: Oct 6, 2019, 01:41 PM IST
पतीसह दुर्गापूजेसाठी पोहोचल्या संसदेतील ग्लॅमरस खासदार नुसरत जहाँ title=
पतीसह दुर्गापूजेसाठी पोहोचल्या संसदेतील ग्लॅमरस खासदार

मुंबई : अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी नुकतच पती निखिल जैनसोबत देवीची आराधना केली. दुर्गाष्टमी आणि दुर्गापूजेचं औचित्य साधत कोलकाता येथील सुरुची संघ नामक एका दुर्गापूजा मंडपात त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 

पतीसह दुर्गापूजेसाठी आलेल्या ग्लॅमरस खासदार नुसरत जहाँ यांनी यावेळी पारंपरिक वाद्य वाजवत या उत्सवाचा आनंद घेतला. यावेळीत या सेलिब्रिटी जोडीच्या चेहऱ्यावर बराच आनंद पाहायला मिळाला. सर्वसामान्यांच्या साथीने उत्साही वातावरणात सहभागी होणाऱ्या मुसरत यांनी यावेळी सोशल मीडियावर पतीसोबचे काही फोटोही शेअर केले. 

काही फॅन पेजवरही या जोडीचे अनेक फोटो पाहायला मिळाले. ज्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. नुसरत यांनी हे फोटो शेअर करताच आणि त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, काही सोशल मीडिया युजर्सनी या साऱ्याचा संबंध नुसरत यांच्या धर्माशी जोडला.  

कट्टरतावाद्यांकडून नुसरत यांच्या नावे फतवा काढला जाऊ शकतो, असं काही नेटकरी म्हणाले. तर काहींनी तिच्यावर उगाचच तोफ डागली. नुसरतवर टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, दुसऱ्या धर्मात लग्न करण्यासाठी, संसदेत पाश्चिमात्य पेहरावात जाण्यासाठी त्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या होत्या. धर्मच्या मुद्द्यावरुन होणारे हे वाहद पाहता नुसरत यावर कशी व्यक्त होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Ashthami te #suruchisangha with beloved hubby @nikhiljain09 and dada #aroopbiswas #durgapuja #truebong #secularbengal

A post shared by Nusrat (@nusratchirps) on