Actress Kriti Varma Money Laundering Case : अभिनेत्री कृती वर्मा (Kriti Varma) ही आधी एक जीएसटी इन्स्पेक्टर होती. कृती वर्माला आता मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर जबाब नोंदवला आहे. कृतीनं तिच्या वरिष्ठांचे लॉगिन क्रेडेंशियल्स वापरत 264 कोटी रुपयांची उलथा पुलथ केली, असा आरोप तिच्यावर आहे.
ईडीचे म्हणणे आहे की मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलेले हे पैसे भूषण पाटील यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत आणि यातील काही भाग प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी वापरण्यात आला आहे. खरेदी करण्यात आलेली काही प्रॉपर्टी ही कॉती वर्माच्या नावावरही आहे. मात्र, क्रिती वर्मानं हे आरोप फेटाळले आहे. यावर कृती म्हणाली की, भूषण पाटील यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी तिनं एक डान्स केला होता. त्यासाठी तिला एक कोटी रुपये मानधन मिळाले होते. यावर कृती म्हणाली की एक जबाबदार नागरिक म्हणून तिनं आरोपी संबंधित असलेली माहिती देऊन एजन्सींना मदत केली. क्रिती पुढे म्हणाली की गुन्हा झाल्यानंतर 2020 साली एका डान्स शोदरम्यान, भूषण पाटील आणि तिची ओळख झाली आणि ते रिलेशनशिपमध्ये आले. कृतीनं पुढे सांगितले की फसवणूक केल्याची माहिती मिळताच पुढच्या 6 महिन्यात भूषण पाटील यांच्यापासून विभक्त झाली. ईडीनं तात्पुरत्या स्वरूपात तिची संपत्ती ही जप्त केली आहे.
भूषण पाटील यांच्यासोबत तानाजी मंडल या बड्या अधिकाऱ्यानं हातमिळवणी करून ही फसवणूक केल्याचं असं बोललं जात आहे. तानाजी मंडल हा तत्कालिन वरिष्ठ सहायक निरिक्षक पदी कार्यरत होता. त्यानं कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून गोपिनीय माहिती आणि पासवर्ड घेतले. त्यानं त्याचा वापर हा भूषण यांच्या कंपनीतील एका खात्यात खऱ्या आणि बोगस टीडीएस परताव्यासाठी केल्याचेही समजतं.
हेही वाचा : Rakhi Swant च्या हाती लागली पती आदिल खानच्या पहिल्या लग्नाची पत्रिका!
नोव्हेंबर 2019 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत, भूषण पाटीलनं 264 कोटी रुपयांच्या 12 बोगस टीडीएस परताव्यांना मंजुरी दिली होती. या अधिकाऱ्याला 2021 मध्ये आयटी इन्स्पेक्टर म्हणूनही बढती देण्यात आली होती. फसवणुकीची रक्कम सरकारी खात्यातून ट्रान्सफर करणाऱ्या बँकेने याबाबत तक्रार केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. जानेवारी 2022 मध्ये, सीबीआयनं पाटील आणि चार अधिकाऱ्यांवर अनोळखी व्यक्तींची नावे घेऊन फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. सीबीआय एफआयआरमध्ये क्रिती वर्माचे नाव नव्हते. यानंतर ईडीने एफआयआरच्या आधारे लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला.
क्रितीनं जीमॅटची परीक्षा दिली आणि जीएसटी अधिकारी झाली. त्यानंतर ती मुंबईत आली आणि तिनं रोडीज एक्सट्रीममध्ये स्पर्धक म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. याशिवाय बिग बॉस 12 ची पहिली कॅप्टन होती. क्रिती त्या सीजनची विजेता ठरली नाही मात्र, तिनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
ईडीनं एपआयआरच्या आधारावर मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल केला. गेल्या महिन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एकूण 70 कोटी रुपयांच्या एकूण 32 प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या होत्या. तात्पुरत्या स्वरूपातजी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे आणि उडुपी भागातील जमीन आणि पनवेल आणि मुंबईतील फ्लॅट्सच्या स्वरूपात होती. यामध्ये तीन लक्झरी कार (BMW X7, Mercedes GLS400d, Audi Q7) यांचा समावेश होता. भूषण पाटील, राजेश शेट्टी, सारिका शेट्टी, क्रिती वर्मा आणि इतरांच्या नावावर या प्रॉपर्टी होत्या. यापूर्वी, ईडीनं या प्रकरणात 96 कोटी रुपयांची विविध संस्थांची बँक खाती गोठवली होती. आतापर्यंत, ईडीने या प्रकरणात 166 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आणि बँक बॅलन्स एकत्र जप्त केले आहेत