अयोध्येतील राम मंदिरासाठी या अभिनेत्रीने दिला १ लाख रुपयांचा निधी

राम मंदिरासाठी निधी संकलनाची मोहिम आजपासून सुरु होत आहे.

Updated: Jan 15, 2021, 11:39 AM IST
अयोध्येतील राम मंदिरासाठी या अभिनेत्रीने दिला १ लाख रुपयांचा निधी title=

मुंबई : अभिनेत्री प्रणिता सुभाषने अयोध्येत राम मंदिराच्या भव्य बांधकामासाठी 1 लाख रुपयांचा निधी समर्पित करण्याची घोषणा केली आहे. प्रणिता सुभाषने ट्विटरवर आपल्या योगदानाची घोषणा केली, 'मला अयोध्या राम मंदिर निधी समर्पण मोहिमेमध्ये 1 लाख द्यायचे आहे' आपणा सर्वांना या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याची विनंती मी करते.

प्रणिता सुभाष कन्नड चित्रपट 'राम अवतार' मध्ये दिसणार आहे. याशिवाय भुज: द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटातही ती दिसणार आहे. तिच्या चित्रपटात अजय देवगण महत्वाची भूमिका साकारणार आहे. प्रियदर्शनच्या ‘हंगामा टू’ मध्येही ती दिसणार आहे. या चित्रपटात परेश रावल आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत.

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देशभरात आजपासून निधी संकलनाची मोहीम सुरू झाली असून हा निधी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र नावाने स्वीकारला जाणार आहे. देशभरात ही मोहिम राबविला जात आहे. 27 फेब्रुवारी पर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे. प्रत्येकजण स्वेच्छेने निधी देऊ शकतो. या मोहिमेची जबाबदारी विश्व विश्व परिषदेने घेतली आहे.

प्रणिता सुभाष कन्नड, तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये तिच्या उत्तम अभिनयासाठी लोकप्रिय आहेत. तिने अनेक हिट चित्रपट आतापर्यंत दिले आहेत.