मुंबई : सबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरुनच मुंबईत परतावं लागलंय. यावेळी मुंबई विमानतळावर तृप्ती देसाईंविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. विमानतळावर बजरंग दल आणि सबरीमला मंदिर प्रथा समर्थकांनी देसाई यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सबरीमला मंदिरात प्रवेशाची जाहीर घोषणा करीत तृप्ती देसाई यांनी गुरुवारी केरळकडे प्रस्थान केलं होतं.
शुक्रवारी पहाटे त्या कोची विमानतळावर पोहोचल्या. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केरळ सरकारने त्यांना विमानतळावरच रोखले.
मंदिराकडे त्यांना जाऊही दिले नाही. त्यामुळे मंदिर प्रवेश न करताच त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परतावं लागलं.
त्यानुसार, मुंबई विमानतळावर परतल्यानंतर त्यांच्यासमोर सबरीमला मंदिर प्रथेचे समर्थन करणाऱ्यांनी निषेध नोंदवला.