विद्यार्थी हत्याप्रकरणी आरोपी बस कंडक्टरच्या कुटुंबीयांचे धक्कादायक आरोप

गुरुग्रामच्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्याप्रकरणी आरोपी बस कंडक्टर अशोकच्या कुटुंबीयांनी धक्कादायक आरोप केले आहेत. या प्रकरणात अशोकला अडकवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

Updated: Sep 10, 2017, 12:19 PM IST
विद्यार्थी हत्याप्रकरणी आरोपी बस कंडक्टरच्या कुटुंबीयांचे धक्कादायक आरोप title=

नवी दिल्ली : गुरुग्रामच्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्याप्रकरणी आरोपी बस कंडक्टर अशोकच्या कुटुंबीयांनी धक्कादायक आरोप केले आहेत. या प्रकरणात अशोकला अडकवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

अशोक पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर आरोपी अशोकच्या बहिणीने अप्रत्यक्षपणे शाळा प्रशासनावर निशाणा साधला आहे. कबुली जबाब देण्यासाठी अशोकवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. इतकंच नाही तर त्याला मारहाण करण्यात आल्याचंही तिने म्हटलं आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकाने अशोकला फसवण्यासाठी लाच दिल्याचा आरोपही तिने केला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आरोपी अशोकच्या कुटुंबीयांवर गावातल्या नागरिकांनी बहिष्कार टाकण्यात आला आहे. प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येप्रकरणी आरोपी अशोकला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.