Kerala Blasts : आत्मसमर्पण करण्यापूर्वी आरोपीने केलं होतं FB Live, सांगितलं बॉम्बस्फोटाचं खरं कारण

Kerala Convention Centre Blasts : केरळमधील एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेत एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं होतं. मात्र, पोलिसांना शरण जाण्यापूर्वी आरोपीने फेसबूक लाईव्हच्या (Dominic Martin FB live) माध्यमातून आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडल्याचं समोर आलंय.

Updated: Oct 29, 2023, 10:18 PM IST
Kerala Blasts : आत्मसमर्पण करण्यापूर्वी आरोपीने केलं होतं FB Live, सांगितलं बॉम्बस्फोटाचं खरं कारण title=
Dominic Martin had done FB live before surrendering

Kerala Ernakulam Blast Updates : केरळमधील ख्रिश्चन धार्मिक मेळाव्यात बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. कन्व्हेन्शन सेंटरमधील कार्यक्रमात स्फोट (Kerala Convention Centre Blasts) झाला होता, ज्यात सुमारे 45 लोक जखमी झाले होते, एकाचा मृत्यू झाला आहे. इतर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटांची जबाबदारी डॉमिनिक मार्टिन (Dominic Martin) नावाच्या व्यक्तीने घेतली. स्वत:ला पोलिसांच्या हवाली करण्याआधी डॉमिनिक मार्टिन याने चक्क फेसबूस लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडलं आहे. त्यामुळे पोलीस देखील चक्रावल्याचं दिसून आलंय. नेमकं काय म्हणाला मार्टिन पाहा...

डोमिनिक मार्टिनने फेसबुक लाईव्ह दरम्यान त्याला शोधण्याची गरज नाही, असं सांगितलं. मी यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणीशी सहमत नाही, असं मार्टिन म्हणतो. यहोवाची विचारधारा धोकादायक आहे. ते लोक लहान मुलांच्या मनात विष पसरवत आहेत. आज कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेदरम्यान जे काही घडले त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. मी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे, असं डोमिनिक मार्टिनने एफबी लाईव्हमध्ये म्हटलंय. त्याचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस (Kerala Police) खात्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

पाहा Video

मार्टिनच्या आत्मसमर्पणानंतर केरळमधील 14 जिल्ह्यांतील पोलीस प्रमुखांना त्यांच्या भागात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरही बारीक लक्ष ठेवलं जातंय. संवेदनशील पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा थेट इशारा केरळ पोलिसांनी दिला आहे.

केरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण

देवेंद्र फडणवीस म्हणतात...

दरम्यान, महाराष्ट्रात देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. आम्ही नेहमी सतर्क आहोत, वेगळा इशारा देण्यात आलेला नाही, परंतु मुंबई आणि पुणे सारखी मोठी शहरे महाराष्ट्रात असल्यानं आम्ही सावध आहोत. आम्हाला सतत काळजी घ्यावी लागेल की चुकीच्या कारवाया होणार नाहीत. त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) म्हटलं आहे.