अर्थतज्ञ मीरा सन्याल यांचे कर्करोगाने 57 व्या वर्षी निधन

 २०१४ साली आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी बँकिंग क्षेत्रातलं करिअर सोडलं होतं.

Updated: Jan 12, 2019, 07:39 AM IST
अर्थतज्ञ मीरा सन्याल यांचे कर्करोगाने 57 व्या वर्षी निधन  title=

नवी दिल्ली : अर्थतज्ञ आणि भारतातील स्कॉटलंड बँकेच्या माजी सीईओ मीरा सन्याल यांचे निधन झाले. कर्करोगाच्या दीर्घ आजारानं वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०१४ साली आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी बँकिंग क्षेत्रातलं करिअर सोडलं होतं. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सन्याल यांनी दक्षिण मुंबईतून 'आप'च्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्याआधी २००९ सालीसुद्धा दक्षिण मुंबईतून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या दोन्ही वेळी त्यांचा पराभव झाला.

आप नेत्यांची श्रद्धांजली

नुकतंच नोव्हेंबरमध्ये त्यांनी नोटाबंदीशी संबंधित 'द बिग रिव्हर्स' नावाने एक पुस्तकही प्रकाशित केले. मीरा सन्याल यांच्या निधनानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. अंत्यत दु:खद बातमी असल्याचे केजरीवाल म्हणाले. तीक्ष्ण आर्थिक प्रतिभा आणि उदार आत्मा आपल्यातून गेल्याचे दु:ख सिसोदिया यांनी व्यक्त केले.