नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्ग कमी होण्याबाबत काही चांगले संकेत मिळत आहेत. अनेक राज्यांनी लावलेल्या लॉकडाऊनमुळे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगाना सह 18 राज्यांमध्ये दररोज होणाऱ्या रुग्णवाढीत घट होत आहे.
----------------------
महाराष्ट्र सावरतोय
महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात सोमवारी केवळ 37 हजार 236 नवीन केसेस नोंदवले गेले आहेत. या आधी कोरोना संक्रमित नवीन केसेसची संख्या 60 हजार ते 65 हजार ओलांडत असत. परंतु गेल्या 6 -7 दिवसांपासून या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. ज्यामुळे दिवसातील नवीन केसेस 50 हजार ते 55 हजारांवर स्थिर होऊ लागली होती आणि त्यानंतर अचानक सोमवारची रुग्ण संख्या सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी होती.
कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर सोमवारी नवीन पॅाझिटिव्ह रुग्णांचा हा इतका कमी आकडा खरोखरच विक्रमी आकडा आहे. सुमारे दीड महिन्यांनंतर, महाराष्ट्रात इतके कमी केसेस समोर आले आहेत आणि कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या बाबतीत मुंबईने तर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
दुसरी एक महाराष्ट्रासाठी चांगली बातमी ही आहे की, आता मुंबई सारखेच महाराष्ट्रातील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोना बाधीत होणाऱ्या नवीन रुग्ण संख्येपेक्षा जास्त आहे. सोमवारी नवीन पॉझिटिव्ह केसेसपेक्षा कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही खूपच जास्त होती. महाराष्ट्रात सोमवारी 61 हजार 607 जणांनी कोरोनावर मात केली आहे.