Rainbow Corn, केरळ : पाऊस आणि मका हे अनेकांच आवडतं कॉम्बिनेशन. मात्र, भारतातील शेतकऱ्याने कलरफुल प्रयोग करत या कॉम्बिनेशनमध्ये आणखी व्हेरिएशन आणले आहे. केरळ मधील एका शेतकऱ्याने रंगीत अर्थात इंद्रधनुष्याच्या रंगातील मक्याची शेती केली आहे. शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी झाला असून हा कलरफुल मका चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात मक्याची शेती केली जाते. केरळ (Kerala) मधील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात या रंगीत मक्याचे पिक घेतले आहे. अब्दूल रशिद (Abdul Rashid) असं या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मल्लाप्पुरम (Mallappuram) येथे राहतात. विशेष म्हणजे रशीद यांनी घराच्या छतावरच या रेनबो कॉर्नची शेती केली आहे. इंद्रधनुष्याच्या रंगातील हा मका दिसायला अत्यंत आकर्षक आहे.
अशा प्रकारच्या मक्याच्या कणसाला भरपूर सूर्यप्रकाशाची (Of sunlight) आवश्यकता असते. यामुळे घराच्या छतावरच रशीद यांनी या रेनबो कॉर्नची शेती केली. भरपूर सूर्यप्रकाश आणि पिकाची योग्य काळजी घेत रशीद यांनी हा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे.
या रंगीत मक्याची चव ही नियमीत मक्याच्या चवीसारखीच आहे. ज्या प्रकारे नियमीत मक्याच्या वेगवेगळ्या रेसीपी केल्या जातात तशाच रेसीपी या मक्याच्या देखील करता येतात. विशेषत: एखाद्या पदार्थ सर्व्ह करताना सजावट म्हणून देखील या रंगीत मक्याचा वापर केला जातो.
तांबडा, पांढरा, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा अशा रेनबो कलर्सचे दाणे असलेला हा मका सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. थायलंडमध्ये सर्व प्रथम या रेनबो कॉर्नचे पीक घेण्यात आले.