२४ तासात देशात ९९८३ रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या अडीच लाखांच्या वर

कोरोना रुग्णांची संख्या वाढली...

Updated: Jun 8, 2020, 11:05 AM IST
२४ तासात देशात ९९८३ रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या अडीच लाखांच्या वर title=

मुंबई : देशात कोरोना रूग्णांची संख्या अडीच लाखांच्या पुढे गेली आहे. सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अपडेटनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 611 वर पोहोचली आहे. तर 7 हजार 135 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 1 लाख 24 हजार 95 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 1 लाख 25 हजार 381 रुग्ण उपचार घेत आहेत.

गेल्या 24 तासांत सुमारे 10 हजार नवीन रुग्ण वाढले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा महाराष्ट्रात झाला आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 975 वर गेली असून त्यापैकी 3060 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 39 हजार 314 जण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 43 हजार 601 रुग्ण उपचार घेत आहेत.

तामिळनाडू दुसर्‍या क्रमांकावर आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या 31 हजार 667 आहे, त्यापैकी 269 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 16 हजार 999 लोक बरे झाले आहेत. दिल्ली तिसर्‍या क्रमांकावर आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या 27 हजार 654 आहे, ज्यामध्ये 761 लोक मरण पावले आहेत आणि 10 हजार 664 लोक बरे झाले आहेत.

गुजरातमधील कोरोना रूग्णांची संख्या 20 हजारांच्या पलीकडे गेली आहे. आतापर्यंत येथे 1249 लोक मरण पावले आहेत आणि 13 हजार 635 लोक बरे झाले आहेत. राजस्थानमधील रूग्णांची एकूण संख्या 10 हजार 599 आहे, ज्यात 240 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2718 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

उत्तर प्रदेशात संक्रमित झालेल्यांची संख्या 10 हजार 536 वर गेली असून 275 लोकांचा मृत्यू झाला आहे. 6185 लोक बरे झाले आहेत. मध्य प्रदेशमधील रुग्णांची संख्या 9401 आहे, ज्यात 412 लोकांचा मृत्यू झाला असून 6331 लोक बरे झाले आहेत.