मॉलमध्ये ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गेमिंग झोनचा कर्मचारी ताब्यात

इंदौरमधल्या एका शॉपिंग मॉलमध्ये ९ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Updated: Mar 9, 2018, 03:49 PM IST
 मॉलमध्ये ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गेमिंग झोनचा कर्मचारी ताब्यात  title=

इंदौर : इंदौरमधल्या एका शॉपिंग मॉलमध्ये ९ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

कोपऱ्यात नेऊन अत्याचार 

एम.जी रोडमधील शॉपिंग मॉल ट्रेजर आयलॅंडच्या गेमिंग झोनच्या कर्मचारी अर्जुन राठोड अल्पवयीन मुलीला जबरदस्ती कोपऱ्यात घेऊन गेला.

त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप राठोडवर असल्याचे पोलीस उप महानिरीक्षक (डीआयजी) हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितले. 

सुरक्षेची तपासणी करणार 

 आरोपीला आयपीसी धारा ३७६ अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. आम्ही शॉपिंग मॉलची सुरक्षा व्यवस्थेचे परिक्षण करत आहोत. गरज पडल्यास मॉलमध्ये अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.