नवी दिल्ली : रुपयामध्ये घसरण पाहायला मिळाल्यामुळे भारतात कच्चा तेलाच्या दरात सतत वाढ पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत शुक्रवारी 7 सप्टेंबर रोजी देखील वाढ पाहायला मिळत आहे. पेट्रोल - डिझेलच्या दरात पुन्हा एकदा रेकॉर्ड स्तर पाहायला मिळत आहे. चार शहरात पेट्रोलची किंमत 80 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी त्रास देणार असल्याचे सांगितलं जात आहे. विरोधी पक्ष सतत पेट्रोल - डिझेलच्या दरात जीएसटी आणण्याची मागणी करत आहे. तर सरकार एक्साइज ड्युटीमध्ये कमी करण्यास मनाई करत आहे.
Petrol & Diesel prices in #Delhi are Rs.79.99 per litre & Rs.72.07 per litre, respectively. Petrol & Diesel prices in #Mumbai are Rs.87.39 per litre & Rs.76.51 per litre, respectively. pic.twitter.com/iBdzvAB2rW
— ANI (@ANI) September 7, 2018
शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 79.99 रुपये प्रती लीचर तर डिझेलचा दर 72.07 प्रती लीटर पर्यंत पोहोचला आहे. तिथेच मुंबईत पेट्रोलची किंमत 87.39 रुपये प्रती लीटर आहे तर डिझेलची किंमत 76.51 प्रती लीटर आहे.