नई दिल्ली: 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळू शकते. केंद्र सरकारने नुकताच महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के झाला आहे. आता मोदी सरकार कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट देण्याची तयारीत आहे. 'डीए'नंतर आता HRA मध्येही वाढीचीही घोषणा केली जाऊ शकते.
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ जाहीर करण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या पगारासोबतच कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचाही लाभ मिळणार आहे. यासोबतच आता एचआरएमध्येही लवकरच वाढ होऊ शकते.
डीए वाढवल्यानंतर HRAमध्येही वाढ होण्याची अपेक्षा वाढली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये एचआरएमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर डीएही वाढवून 28 टक्के करण्यात आला. आता डीए 34 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे, एचआरएमध्ये देखील वाढ केली जाऊ शकते.
DA Hike, Dr Hike, Central Government Employees, Pensioner Salary Hike, House Rent Allowance,