7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central government employees) पुन्हा गूडन्यूज मिळणार आहे. केंद्र सरकारने (Central Government) डीएमध्ये (Da) वाढ केली आहेच. सरकार त्यासोबत आता आणखी एक भत्ता वाढविण्याचा विचार करत आहे. जर असं झालं तर कर्मचाऱ्यांच्या पगारात (Salary) मोठी वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डीए वाढीसोबत एचआरए (HRA) वाढीचीही घोषणा केली जाऊ शकते. वास्तविक, डीए वाढीसह, एचआरएमध्ये सुधारणा देखील अपेक्षित आहे. (7th pay commission government will incresed hra after da soon know details)
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या (Pensioners) डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच या महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार आहे. यासोबतच एचआरएमध्ये वाढ करण्याची घोषणाही लवकरच होऊ शकते. याआधी जुलै 2021मध्ये एचआरएमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर डीए देखील 28 टक्के करण्यात आला. आता डीए 38 टक्के आहे. तर एचआरएमध्येही बदल होऊ शकतो.
ज्या शहरांची लोकसंख्या 50 लाखांपेक्षा जास्त आहे ती 'X' श्रेणीत येतात. त्याचबरोबर ज्या शहराची लोकसंख्या 5 लाखांपेक्षा जास्त आहे, ते ‘Y’ वर्गात येतात. 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे 'Z' श्रेणीत येतात. तिन्ही श्रेणींसाठी किमान एचआरए 5 हजार 400, 3 हजार 600 आणि 1 हजार 800 रुपये असेल.
वरील हिशोबाने कर्मचार्यांचा एचआरए ते काम करत असलेल्या शहराच्या श्रेणीनुसार ठरेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, X श्रेणीतील शहरांमध्ये राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा HRA DA प्रमाणेच 4 ते 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या या शहरांतील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 27 टक्के एचआरए मिळतो.
तसेच वाय श्रेणीतील शहरांसाठी एचआरएमध्ये 2 टक्के वाढ शक्य आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना 18 ते 20 टक्के एचआरए मिळतो. त्याचवेळी झेड श्रेणीतील शहरांसाठी 1 टक्के एचआरए वाढवता येऊ शकतो. त्यांना सध्या 9-10 टक्के दराने HRA दिला जातो.