7th Pay Commission: खुशखबर! या तारखेपासून केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात होणार एवढी वाढ

7th  वेतन आयोगांतर्गत, पगाराची मोजणी करताना कर्मचार्‍यांच्या मूलभूत पगारावर DA मोजावा लागेल.

Updated: Jul 2, 2021, 08:34 PM IST
7th Pay Commission: खुशखबर! या तारखेपासून केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात होणार एवढी वाढ title=

मुंबई : कोरोना कालावधीमुळे केंद्रीय कर्मचार्‍यांची गेल्या वर्षापासून डीएमधील वाढ थांबली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी यावर्षीतरी ही वाढ होईल अशी अपेक्षा ठेऊन आहेत. अशा परिस्थितीत लवकरच या कर्माचाऱ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण सप्टेंबरपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे डीएचे पैसे येण्यास सुरू होणार असल्याची बातमी समोर येत आहे. यामहिन्यात येणाऱ्या पगारामध्ये त्यांना मागच्या तीन हप्त्यांचे थकबाकी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

नॅशनल कॉन्सिल ऑफ जेसीएमच्या सचिवाच्या मते केंद्रीय कर्मचार्‍यांचा DAमध्ये त्यांच्या मूलभूत वेतनापेक्षा 31% वाढ केली जाईल. अशा परिस्थितीत त्यांना 7750 रुपयांपर्यंत पगारा वाढवून मिळण्याची शक्यता आहे.

पगार कसा वाढेल हे जाणून घ्या

7th  वेतन आयोगांतर्गत, पगाराची मोजणी करताना कर्मचार्‍यांच्या मूलभूत पगारावर DA मोजावा लागेल. त्यामुळे समजा एखाद्या व्यक्तीचा मूळ वेतन 25 हजार रुपये असेल, तर त्याचा डीए 25 हजारावर 31% वाढेल. म्हणजेच एकूण त्याला 7 हजार 750 रुपये पगार जास्त मिळणार आहे.

त्याचप्रमाणे, 7th CPC Pay Matrixमध्ये इतर केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगारही वेगळे असतील. त्यानी आपला मूलभूत पगार पाहून त्यावर आपला पगार किती येईल याची गणना करता येईल.

आतापर्यंत महागाई भत्ता 17 टक्के दराने दिला जात होता. म्हणजेच ज्यांचा मूलभूत वेतन 25 हजार रुपये असेल त्यांना या 17 टक्के DA नुसार 4250 रुपये मिळत होते. परंतु DA मध्ये वाढ झाल्याने अशा लोकांना आता सुमारे 7750 रुपये मिळणार आहे.

थकबाकी कधी मिळेल

केंद्रीय कर्मचार्‍यांना 30 सप्टेंबर रोजी येणाऱ्या पगारात शेवटच्या तीन हप्त्यांचा महागाई भत्ता देण्यात येईल. त्याचबरोबर दोन महिन्यांचे थकबाकी जुलै आणि ऑगस्टमध्येही उपलब्ध होईल.

सुत्रांच्या माहितीनुसार जून 2021 मध्येही 3 टक्के डीए वाढणार आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 14 टक्क्यांनी वाढेल.

गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे डीए थांबवला गेला होता, परंतु जुलैपासून तो पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळणार आहे.