Corona च्या दुसऱ्या लाटेत इतक्या डॉक्टरांचा मृत्यू, राज्यात किती जणांनी जीव गमावला?

डॉक्टरांनी कोरोना विरुद्ध  दिवसरात्र लढा दिला.

Updated: Jun 16, 2021, 07:18 PM IST
Corona च्या दुसऱ्या लाटेत इतक्या डॉक्टरांचा मृत्यू, राज्यात किती जणांनी जीव गमावला?  title=

मुंबई : देशात 2020 च्या सुरुवातीपासून कोरोनाने (Corona Virus) घातलेलं थैमान आजही कायम आहे. कोरोनावर मात करण्यासाठी तसेच रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांचं सर्वात मोठ योगदान राहिलं आहे. डॉक्टरांनी कोरोना विरुद्ध  दिवसरात्र लढा दिला. यामुळे आतापर्यंत आपण पहिली आणि दुसरी लाट थोपवली आहे. पण दुर्देवाने कोरोना विरुद्ध लढताना अनेक डॉक्टरांना जीवाला मुकावे लागले. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत 730 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. आयएमएने  (IMA) याबाबतचं एक ट्विट केलं आहे. याद्वारे ही माहिती दिली आहे. ( 730 doctors have died during second wave of COVID19 pandemic,says Indian Medical Association)

ट्विटमध्ये काय म्हटलंय? 

आयएमएने राज्यनिहाय मृत्यू झालेल्या डॉक्टरांची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार बिहारमध्ये सर्वाधिक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये एकूण 115 डॉक्टरांना कोरोनामुळे जीव गमावावा लागला आहे. तर दिल्लीमध्ये कोरोनाने 109 डॉक्टरांना हिरावून घेतलं आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले. राज्यातही कोरोनाने 23 डॉक्टरांचा घात केला.

संबंधित बातम्या : 

अनलॉक होताच मॉलमध्ये एकच गर्दी, व्हीडिओ व्हायरल

सावधान... ! आता सापडला हिरव्या बुरशीचा रुग्ण, काय आहेत लक्षण जाणून घ्या...