रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानं ३० जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर शहरात धक्कादायक घटना घडलीये. 

Updated: Aug 11, 2017, 08:04 PM IST
रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानं ३० जणांचा मृत्यू title=

गोरखपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर शहरात धक्कादायक घटना घडलीये. 

शहरातील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिनचा पुरवठा बंद पडल्याने गेल्या ४८ तासांत ३० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. एएनआयच्या वृत्तानुसार गेल्या ४८ तासांत ३० मुलांनी आपला जीव गमावलाय.

वृत्तानुसार, ६९ लाखांची थकीत रक्कम न दिल्याने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एका फर्मने रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. फर्मने गुरुवारी संध्याकाळी रुग्णालयाचा लिक्विड ऑक्सिजन पुरवठा बंद केला. बीआरडी रुग्णालयात दोन वर्षांपूर्वीच लिक्विड ऑक्सिजनचा प्लांट बसवण्यात आलाय.