गुजरात निवडणूक : दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचे तीन दिवस शिल्लक

गुजरात विधानसभा निवणुकीच्या दुस-या टप्प्यातील प्रचाराला अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. दुस-या टप्प्यात मध्य आणि उत्तर गुजरातमधल्या 93 जागांसाठी जोरात प्रचार सुरू आहे. 

Updated: Dec 10, 2017, 11:16 AM IST
गुजरात निवडणूक : दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचे तीन दिवस शिल्लक title=

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवणुकीच्या दुस-या टप्प्यातील प्रचाराला अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. दुस-या टप्प्यात मध्य आणि उत्तर गुजरातमधल्या 93 जागांसाठी जोरात प्रचार सुरू आहे. 

भाजप आणि काँग्रेसच्या प्रचाराची सर्व मदार मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर आहे. दोघांच्याही गेल्या तीन दिवसांपासून दिवसाला चार सभा सुरू आहेत. 

प्रचाराचा सुपरसंडे

सुपरसंडेला मोदींच्या उत्तर गुजरातमधील बनासकांठामध्ये एक सभा आहे. तर उर्वरित तीन सभा या गांधीनगर, साणंद आणि बडोद्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. तर राहुल गांधी यांच्या मध्य गुजरातमधील खेडा आणि गांधीनगरमध्ये दोन तर उत्तर गुजरातमधील अरवली आणि बनासकांठामध्ये दोन अशा चार सभा होणार आहेत. 

मोदींनी घेतला काँग्रेसचा समाचार

शनिवारी सभांमध्ये मोदींनी आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचा समाचार घेतला. तर मोदींच्या प्रचारातून विकास आणि भ्रष्टाचार गायब झाला असून ते स्वत:विषयीच बोलू लागल्याचा हल्लाबोल राहुल गांधींनी चढवलाय. त्यामुळं आता अखेरच्या तीन दिवसांत प्रचाराचे मुद्दे काय असणार याकडे लक्ष लागलंय.