पंचकुला हिंसाचारात २८ जणांचा मृत्यू, २५० लोक जखमी

बाबा राम रहिम गुरमीत सिंग याला कोर्टाने दोषी जाहीर केल्यानंतर पंचकुला येथे जमा झालेले राम रहिम समर्थक हिंसक झाले आहेत. राम रहिमला अटक झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण २८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच, या हिंसाचारात तब्बल २५० लोक जखमी झालेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 25, 2017, 10:44 PM IST
पंचकुला हिंसाचारात २८ जणांचा मृत्यू, २५० लोक जखमी title=

चंदीगड : बाबा राम रहिम गुरमीत सिंग याला कोर्टाने दोषी जाहीर केल्यानंतर पंचकुला येथे जमा झालेले राम रहिम समर्थक हिंसक झाले आहेत. राम रहिमला अटक झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण २८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच, या हिंसाचारात तब्बल २५० लोक जखमी झालेत. 

हरियाणातील पंचकुलामध्ये आज डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम याला बलात्कार आणि लैंगिक शोषण या दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. त्यानंतर पंचकुलामध्ये हिंसाचार उसळला. तोडफोड आणि  जाळपोळीच्या घटना घडल्यात. डेरा सच्चा सौदाचे हजारो समर्थक आधीपासूनच पंचकुलामध्ये तळ ठोकून बसले होते.

दरम्यान, राम रहिमला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसेमुळे सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. याची दखल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने घेतली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी डेराची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पंचकुलामध्ये राम रहीमच्या समर्थकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. या हिंसेमुळे २८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हिंसा उसळलल्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने डेरा सच्चा सौदाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत.