अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ले आणि बॉम्बस्फोट, १८ सैनिक ठार

अफगाणिस्तानमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघातकी आणि बॉम्ब  हल्ल्यात २३ जण दगावले तर अनेकजण गंभीर जखमी झाले.

Updated: Feb 24, 2018, 03:48 PM IST
अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ले आणि बॉम्बस्फोट, १८ सैनिक ठार  title=

काबुल : अफगाणिस्तानमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघातकी आणि बॉम्ब  हल्ल्यात २३ जण दगावले तर अनेकजण गंभीर जखमी झाले.

पश्चिम प्रांतातील अफगाणी सेनेवेर हा हल्ला झाला. तालिबान दहशतवादी हल्ल्यात १८ सैनिक मारले गेले.

तालिबानने दिली कबुली 

फराहच्या बाला बुलुक जिल्ह्यातील एका सेना दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

तालिबानने हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे सुरक्षा मंत्रालय प्रवक्ता दौलत वजीर यांनी सांगितले. 

याआधीही हल्ले

काबूलमध्ये दूतावास क्षेत्रातही शनिवारी आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

याआधीही काबुलमधील सैन्य अॅकेडमीवर २९ जानेवारीला इस्लामिक स्टेटने आत्मघातकी हल्ला केला होता. यामध्ये ११ सैनिक मारले गेले तर १६ जखमी झाले. हा हल्ला सकाळी ४ वाजता सुरू झाला.