नवी दिल्ली : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचं एन्काउंटर झाल्यानंतरही बलात्कार करण्याचं धाडस केलं जातं आहे. उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर भागात आणखी एक बलात्काराची घटना उघड झाली आहे. एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्या बलात्कार करण्यात आला आहे. १४ वर्षाची ही मुलगी शेतात भाज्या काढताना तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
धक्कादायक बाब म्हणजे या बलात्काराचा व्हिडिओ चित्रण करण्यात आलं. यात बलात्कार करणारे तीनही जण अल्पवयीन असून व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी देखील अल्पवयीन आहे. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.
सध्या पीडित मुलीवर जवळच्या जिल्ह्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. घडल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील आरोपिंनी पीडित मुलीला दिली. पीडित मुलीच्या काकांनी याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला. तर पोलिसांनी २ तासांमध्ये आरोपिंना ताब्यात घेतले आहे.
सतत होण्याऱ्या बलात्कारांच्या घटनांमुळे देशात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे आता देशात मुली कधी सुरक्षित होतील. हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.