0001 फॅन्सी नंबर प्लेटसाठी मोजावी लागेल इतकी किंमत?

Car Fancy number plate: सध्या नवीन गाडी खरेदी केल्यानंतर VIP नंबर मिळवण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. ज्यामध्ये 0001 क्रमांकाची किंमत पाहून तुम्हाला धक्का बसेल..

Updated: Jul 9, 2024, 05:00 PM IST
0001 फॅन्सी नंबर प्लेटसाठी मोजावी लागेल इतकी किंमत? title=

0001 Car Number Cost: फॅन्सी नंबर प्लेट किंवा VIP नंबर प्लेटची सध्या खूपच क्रेझ वाढलीय. व्हीआयपी नंबर हा कार मालकांसाठी एक सिम्बॉल बनलाय. नवीन कार घेतल्यानंतर लोक VIP नंबर मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत. मार्चमध्ये 0001 क्रमांकाच्या कारच्या लिलावात 23.4 लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. 23.4 लाखामध्ये दोन चांगल्या कार खरेदी करता आल्या असत्या. मात्र, दिखाव्यासाठी या कारला लाखो रुपयांमध्ये खरेदी करण्यात आलं

0001 नंबरला तुफान मागणी

दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, 2024 या वर्षी जूनपर्यंत मासिक लिलावात सर्वाधिक बोली 0001 क्रमांकावर होती. मार्चमध्ये 0001 या नंबर प्लेटच्या कारसाठी 23.4 लाख रुपये बोली लागली. मात्र, सरकारने कार खरेदीदाराची माहिती उघड केलेली नाही. 0001 प्रमाणे 0009 हा क्रमांक जूनमध्ये 11 लाख रुपयांना विकला गेला. 0009 नंबर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, 0007 क्रमांकाची जानेवारीच्या लिलावात 10.8 लाख रुपयांना विक्री झाली. 

इतकी जास्त किंमत का? 

वाहन विभागाच्या माहितीनुसार, 0001 हा क्रमांक खूप खास असून या नंबरसाठी या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक बोली लावण्यात आली होती. कारण हा नंबर अनेकदा फक्त मोठे नेते, मंत्री आणि अधिकारीच खरेदी करतात. त्यामुळे या क्रमांकाची किमंत खूप जास्त असते. 

ट्रेड नंबरच्या लिलावात किंमती:

0002 ते 0009: या क्रमांकांची सुरुवातीची किंमत 3 लाख रुपये आहे.
0010 ते 0099, 0786, 1000, 1111, 7777 आणि 9999: या क्रमांकांची सुरुवातीची किंमत 2 लाख रुपये आहे.
0100, 0111, 0300, 0333 अशा क्रमांकांची सुरुवातीची किंमत 1 लाख रुपये आहे.
त्याचप्रमाणे इतर आवडते क्रमांक आणि त्यांची किंमत सुमारे 25,000 रुपये आहे.
0786 नंबर मुस्लिम समाजात शुभ मानला जातो.