मुंबई : लठ्ठपणा ही एक अशी समस्या आहे, ज्यामुळे बहुतेक लोक चिंतेत असतात. बऱ्याचदा बिझी लाईफस्टाईमुळे लोकांना आपल्या ओरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. तसेच बाहेरील खाणं आणि वेळवेळ गोष्टी न करणे यामुळे अनेकांना आरोग्याशी संबंधीत तक्रारी उद्भवतात. यामध्ये वजन वाढणं ही देखील एक समस्या बनली आहे. ज्यानंतर लोक याला कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु बऱ्याचदा कितीही प्रयत्न केला तरी लोकांना आपलं वजन कमी करणं शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही देखील पोटाच्या चरबीने कंटाळले असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी वाढणं थांबेल, ज्यामुळे तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात या मागील कारणं.
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत संतुलित आहार आणि व्यायाम समाविष्ट करणे आवश्यक आहे. एका संशोधनानुसार, केवळ खराब आहार आणि व्यायामाचा अभाव हे लठ्ठपणाची कारणे नसून झोपेची कमतरता हे देखील त्यामागे एक मोठं कारण आहे.
जर तुम्ही वेळेवर झोपलो नाही तर तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो. चांगली झोप न घेण्याच्या चुकीच्या सवयीमुळे देखील पोटाची चरबी वाढू लागते. त्यामुळे तुमच्या झोपेची वेळ निश्चित करा.
तसेच दररोज किती तास झोपले पाहिजे, याकडे लक्ष द्या. चांगल्या आरोग्यासाठी किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की दिवसाच्या कोणत्याही वेळी झोपणे योग्य आहे.
जे लोक रात्री उशिरा झोपतात किंवा कमी झोप घेतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. रात्री 10 वाजता झोपल्यास लठ्ठपणाचा धोका कमी असतो. एकंदरीत, तुम्हाला चांगली झोप घेण्यासोबतच रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी लागेल, जेणेकरून तुमचा लठ्ठपणा वाढणार नाही.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)