मुंबई : आपल्या आयुष्यातील छोट्या-छोट्या चुका पुढे जाऊन मोठ्या संकटांना कारणीभूत ठरतात. आपण बऱ्याचदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु तुम्हाला माहितीय का की, तुमच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. जर तुम्हाला बसताना किंवा धावताना पाय किंवा हात किंवा कंबरेत दुखत असेल, तर याचे कारण आहे तुमचे हाड. तुमची हाडं कमकुवत असल्यामुळे देखील असू शकतात. हाडे कमकुवत होण्यामागे कोणतेही ठोस कारण नसताना आपल्या काही वाईट सवयी याला कारणीभूत असतात. तुम्हीही अशीच चूक करत असाल तर सावधान.
चला आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपाय आणि सवयी सांगणार आहोत, ज्या आपल्या आजींच्या काळापासून चालत आलेल्या आहेत आणि समस्या दूर करण्यात मदत करतात.
भरपूर खारट पदार्थ खाल्ल्याने हाडांची घनता कमी होऊ शकते. मीठामध्ये असलेले सोडियम शरीरातील कॅल्शियम कमी करते. त्यामुळे जेवणात मीठ चवीनुसार किंवा थोडे कमी असावे.
जर तुम्ही घरून काम करत असाल किंवा तुमची मुलं दिवसभर घरीच राहिली, तर हे हाडे कमकुवत होण्याचे हे एक मोठं कारण असू शरतं. मजबूत हाडांसाठी सूर्यप्रकाशातील व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे.
जास्त आळशीपणा देखील हाडे कमकुवत करू शकतो. शरीराची हालचाल खूप महत्त्वाची असते आणि त्यामुळे तुमची हाडेही मजबूत राहतात.
धुम्रपान किंवा मद्यपान केल्याने तुमच्या फुफ्फुसांवरच नव्हे तर हाडांवरही परिणाम होतो.
अन्नामध्ये पोषक तत्वांचा समावेश न करणे ही देखील मोठी चूक आहे. किशोरवयीन मुलं सगळे पदार्थ खात नाहीत, त्यामुळे त्यांना पुरेसे पोषण मिळत नाही आणि त्यांची हाडे कमकुवत होतात.
पुरेशी झोप न मिळणे आणि रात्रभर वेब सिरीज पाहणे, आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे झोपेसोबतच हाडे कमकुवत होण्याची समस्या देखील होऊ शकते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)