हे '4' पदार्थ पुन्हा गरम करून खाण्याचा मोह टाळा

तव्यावरून थेट ताटात पोळी किंवा दोन्ही वेळेस ताजं बनवलेलं जेवण जेवायला मिळावं असं भाग्य प्रत्येकाचं नसतं. 

Updated: May 28, 2018, 09:09 PM IST
हे '4' पदार्थ पुन्हा गरम करून खाण्याचा मोह टाळा  title=

 मुंबई : तव्यावरून थेट ताटात पोळी किंवा दोन्ही वेळेस ताजं बनवलेलं जेवण जेवायला मिळावं असं भाग्य प्रत्येकाचं नसतं. घडाळ्याच्या काट्यावर धावणारी चाकरमनी मंडळी दिवसभर धावपळ करून उशीरा घरी पोहचतात. अशावेळेस ताजं नाही पण किमान गरम जेवणासाठी पुन्हा तेच पदार्थ गरम करतात. अशाप्रकारे पुन्हा गरम करून जेवायची सवय तुम्हांला असेल तर थोडी काळजी घ्या.. कारण ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. 

त्रासदायक ठरतात 'हे' पदार्थ 

बटाटा - 

बटाटा आवडत नाही अशी मंडळी क्वचितच आढळतात. बटाटा हा विविध स्वरूपात आहारात वापरला जाऊ शकतो. मात्र भाजीसाठी किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी उकडलेला बटाटा रूम टेम्परेचरमध्ये थंड करायला ठेवला तर त्यामध्ये बॉटुलिज्म हा क्वचित आढळणारा बॅक्टेरिया वाढू शकतो. 

मशरूम -  

मशरूमचा आहारात विविध प्रकारे समावेश करता येऊ शकतो. मात्र  मशरूम बनवल्यानंतर तो लगेजच आहारात समाविष्ट करणं आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा मशरूम गरम करून खाल्ल्याने पोट बिघडू शकते. 

अंड - 

अंड हे एक सुपरफूड आहे. सकाळच्या नाश्त्यापासून मधल्या वेळच्या भूकेवर हेल्दी पर्याय म्हणजे अंड. परंतू अंड पुन्हा पुन्हा गरम करून खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. यामुळे पोट बिघडते. 

भात -  

तांदूळ शिजवल्यानंतर तो कशाप्रकारे साठवला जातो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. कच्च्या तांदळामध्ये जीवाणू असतात. तांदूळ शिजवल्यानंतरही ते जीवंत राहू शकतात. भात रूम टेम्परेचरमध्ये ठेवल्यास त्यामधील जीवाणूंचं रूपांतर बॅक्टेरियामध्ये होते. अशाप्रकारचा भात खाल्ल्यास उलटी किंवा डायरियाचा त्रास होतो.